Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात NA Plot घोटाळा..! IAS अधिकाऱ्याला दाखवले प्रांताधिकारी..!

Please wait..

पुणे : जमीन खरेदी आणि विक्री यामध्ये फसवणुकीच्या घटना आता नित्याचाच भाग बनलेल्या आहेत. यामध्ये थेट कॅश व्यवहाराची अघोरी परंपरा कायम ठेवण्यात सरकारी यंत्रणेचा मोठा वाटा आहे. कारण, असे व्यवहार हे काळे पैसे गोरे करण्याचा राजरोस खेळ बनला आहे. त्याचमुळे यात अनेक अपप्रवृत्ती घुसल्या आहेत. असाच प्रकार पुण्यात NA Plot घोटाळा म्हणून उघडकीस आलेला आहे. (pune haveli tahasil na plot scam land development and construction fraud of revenue department)

Advertisement
Loading...

पुणे जिल्ह्यात जमीन अकृषक दाखवण्यासाठी (नॉन अ‍ॅग्रिकल्चर) अनेक बनावट आॅर्डर तसेच भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे ११२ दस्तांची नोंद केल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत. त्यातील  पडताळणी केल्यावर तब्बल ११० एनएच्या आर्डर या बनावट असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पुण्यातील हवेली ३ या दुय्यम निबंधक कार्यालयात घडला असून याबाबतचा अहवाल हा महसूल विभागाकडे सोपवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement

तुकडेबंदी असतानाही बोगस नोंदी केल्याची घटना महसूल विभागात उघडकीस आली होती. यानंतर अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. यानंतर अनेक जमिनींची चुकीच्या पद्धतीने अकृषक म्हणून नोंदणी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर याप्रकरणी प्रशासनाला जाग आली. हवेली ३ निबंधक कार्यालयातील १ हजार ४७२ दस्तांची तपासणी ही गेल्या पाच महिन्यांत करण्यात आल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. यात आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रांताधिकारी दाखवून या नोंदी करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात दोन वर्षांपासून अनधिकृत कामांची दस्त नोंदणीही बंद करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply