Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘वेंकीज’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक..! तब्बल १२ कोटींना गंडा

Please wait..

पुणे : वेंकीज किंवा व्यंकटेश्वरा हॅचरीज ही कुक्कुटपालन (पोल्ट्री) क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. याच कंपनीचे नाव वापरून सुमारे १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. वेंकीज इंडिया या कंपनीच्या नावाचा वापर करून असा प्रकार घडल्याने पोल्ट्री क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Loading...

याप्रकरणी कंपनीच्या वतीने रोहन अजय भागवत (३२, रा. रास्ता पेठ, पुणे) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद केल्यावर पोलिसांनी मोहद मोशाफी वाहिद, संतोष यादव, प्रेम बिहारीलाल साहू, रंजन गुरुचरण प्रसाद कुमार, पर्जा टेक चॅनलधारकांवर गुन्हा दाखल केला आहे.  कंपनीचे संकेतस्थळ, लोगो व मालकाच्या फोटोचा वापर करून संकेतस्थळ व सोशल मीडिया चॅनल सुरू करून त्याद्वारे नागरिकांना ऑनलाइन गुंतवणूक करण्यास भाग पाडून ही फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार आहे. वेंकीज इंडिया ही कुक्कुटपालन क्षेत्रात काम करणारी एक नामवंत कंपनी आहे. कंपनीच्या वेंकिजफार्म डॉट नेट या नावाने संकेतस्थळ व चॅनल सुरू करण्यात आले असल्याने अनेकांची अशी फसवणूक झाली आहे. (Venky’s (India) Ltd a part of the VH Group is an integrated poultry group in Asia. includes production of SPF eggs chicken and eggs processing broiler and layer breeding animal health products Poultry feed & equipment soya bean extract and many more)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply