‘हा’ तर युद्धाचाच इफेक्ट..! भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आलाय नवा अंदाज; वाचा, महत्वाची माहिती..
दिल्ली – रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत लागलेली प्रचंड वाढल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. यामुळेच जागतिक बँक, आशियाई विकास बँकेनंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या विकास दराच्या अंदाजात मोठी कपात केली आहे.
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा (Crude Oil Price)देशांतर्गत वापर आणि खाजगी गुंतवणुकीवर परिणाम होईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने व्यक्त केला आहे. युद्धामुळे जागतिक पुरवठा (Supply) प्रभावित झाला आहे. त्यामुळे जगभरात महागाई वाढत आहे. हे पाहता, चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी IMF ने केंद्रीय बँकांना आर्थिक कठोरपणा घेण्यास सांगितले आहे.
ग्लोबल ग्रोथ आउटलुकमध्ये, IMF ने चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा विकास दर 8.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जानेवारी 2022 मध्ये केलेल्या अंदाजापेक्षा हे 0.8 टक्के कमी आहे. तेव्हा IMF ने भारताचा विकास दर 9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्याचप्रमाणे, पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, भारताची अर्थव्यवस्था (Economy) आधीच्या 7.1 टक्क्यांऐवजी 6.9 टक्के दराने वाढेल. युक्रेन युद्धामुळे जागतिक पुनर्प्राप्तीवर गंभीर परिणाम होईल अशी भीती आयएमएफला आहे. यामुळे वाढ मंदावेल आणि महागाई आणखी वाढेल.
याआधी जागतिक बँकेने भारताच्या विकास दराचा अंदाज 8 टक्क्यांवर आणला होता. भारतीय रिजर्व्ह बँकेनेही मोठी कपात केली आहे, तर भारताची अर्थव्यवस्था 2022-23 मध्ये 7.2 टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे.
अर्थव्यवस्था होणार आणखी फास्ट..! पहा, देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत कुणी व्यक्त केलाय नवा अंदाज..?