Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Jio ने दिलीय मोठी खुशखबर..! पहा, कोणते नवीन फायद्याचे प्लान आणलेत; जाणून घ्या, डिटेल..

मुंबई : जर तुम्ही घरबसल्या नवीन ब्रॉडबँड कनेक्शन (Broadband Connection) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Reliance JioFiber ने वापरकर्त्यांसाठी एक जबरदस्त मनोरंजन बोनान्झा आणला आहे. या अंतर्गत, कंपनी आपल्या पोस्टपेड प्लानद्वारे अमर्यादित फायदे देणार आहे. हे प्लान 399 ते 3,999 रुपयांच्या दरम्यान आहेत. यापैकी काही प्लानमध्ये कंपनी Amazon Prime सोबत Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे. या लाँच केलेल्या प्लानमध्ये, तुम्हाला दरमहा 100 रुपये आणि 200 रुपये अतिरिक्त देऊन 14 ओटीटी अॅपमध्ये प्रवेश मिळेल.

Advertisement

कंपनीचे हे प्लान पूर्वी फक्त बेसिक इंटरनेट प्लान होते. आता कंपनी 200 रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे देऊन फायदे देत आहे. आता या योजना वेगवेगळ्या पर्यायांसह येतात. प्लानमध्ये यूजर्सना इंटरनेट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट प्लसचा पर्याय मिळतो. 399 रुपयांच्या बेसिक प्लानमध्ये तुम्हाला 30Mbps च्या स्पीडने अमर्यादित हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळेल. या प्लानमध्ये तुम्ही दरमहा 100 रुपये अधिक जोडल्यास तुमचा प्लान अपग्रेड केला जाईल आणि तुम्हाला त्यात 6 OTT अॅप सबस्क्रिप्शन मिळेल.

Advertisement

त्याचप्रमाणे, 399 रुपयांच्या मासिक दराने या प्लानमध्ये 200 रुपये प्रति महिना जोडल्यास, तुम्हाला Entertainment Plus लाभ मिळेल, ज्यामध्ये कंपनी 14 अॅप ऑफर करत आहे. हीच योजना 699 रुपयांच्या प्लनसाठी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणारा इंटरनेट स्पीड 100Mbps असेल.

Loading...
Advertisement

999 ते रु. 3999 पर्यंतचे सर्व प्लान एंटरटेनमेंट प्लस श्रेणीतील आहेत, जे पूर्वी देखील येत असत. 999 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 150Mbps स्पीड आणि Amazon Prime मिळेल. त्याच वेळी, 1499 रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी 300Mbps च्या स्पीडसह Amazon Prime आणि Netflix Basic ऑफर करत आहे.

Advertisement

जर तुम्ही कंपनीच्या 2499 रुपयांच्या प्लानमध्ये तर तुम्हाला Amazon Prime आणि Netflix Standard 500Mbps च्या स्पीडसह मिळतील. 3999 रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी Amazon Prime आणि Netflix चे प्रीमियम सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लानमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 1000Mbps आहे.

Advertisement

Jio-Airtel च्या या प्लानमध्ये दररोज मिळतोय 1 GB डेटा; पहा, किती होतील पैसे खर्च

Advertisement
Advertisement

Leave a Reply