Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियात आता पडलाय ‘त्याचा’ ही दुष्काळ; चीनने नकार दिल्यानंतर भारताकडे मागितली मदत; जाणून घ्या..

दिल्ली : युक्रेनवरील हमल्यानंतर पाश्चात्य देशांच्या निर्बंधांना सामोरे जात असलेल्या रशियाने मित्र भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. रशियाने भारताला अधिकाधिक वैद्यकीय उपकरणे (Medical Equipment) पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर, पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे आणि जहाजांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे रशियामध्ये वैद्यकीय उपकरणांची टंचाई निर्माण झाली आहे. रशिया आपली बहुतांश वैद्यकीय उपकरणे युरोप (Europe) आणि चीनमधून (China) आयात करत आहे. मात्र निर्बंधांमुळे रशियाने पुरवठा बंद केला आहे, तर चीननेही निर्यात (Export) टाळली आहे. अशा परिस्थितीत रशियाने आपला सर्वकालीन मित्र भारताकडे मदत मागितली आहे.

Advertisement

असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्री फोरमचे समन्वयक राजीव नाथ म्हणाले की, भारत आणि रशियामधील कंपन्या वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा कसा वाढ करता येईल यावर चर्चा करतील. या संदर्भात 22 एप्रिल रोजी आभासी बैठक होणार आहे. ग्रुप बिजनेस रशियानेही याला दुजोरा दिला आहे.

Advertisement

भारत रशियाला निर्यात वाढ करण्याच्या विचारात आहे. दोन्ही देश स्थानिक चलनात कराराबद्दल चर्चा करत आहेत. शीतयुद्धाच्या काळातही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार स्थानिक चलनाद्वारेच होत होता. तीच यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अनेकदा टीका झाली आहे. युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ नये असे आवाहन अमेरिकेने (America) भारताला अनेकदा केले आहे. मात्र, भारताने ऐतिहासिक संबंध आणि तटस्थतेचा हवाला देत रशियावर टीका करण्यास नकार दिला आहे. तेल खरेदीवर (Crude Oil Purchase) आक्षेप घेण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच सांगितले होते की, भारत एका महिन्यात रशियाकडून जेवढे तेल खरेदी करतो, तेवढे युरोप एका दिवसात खरेदी करतो.

Loading...
Advertisement

सध्या भारत युक्रेन युद्धाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून स्वत:साठी चांगली संधी म्हणून पाहत आहे. एकीकडे तो रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेत आहे, तर दुसरीकडे रशियाच्या बाजारपेठेत निर्यात वाढ करुन व्यावसायिक फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. राजीव नाथ म्हणाले की, भारताची रशियाला निर्यात यावर्षी 2 अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे, जी मागील वर्षांच्या तुलनेत 10 पट जास्त असेल.

Advertisement

रशियाच्या अध्यक्षांनीही मान्य केले ‘ते’ नुकसान; पहा, कशामुळे बसला रशियाच्या अर्थव्यवस्थेला फटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply