Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Happy Birthday Mukesh Ambani: 65 वर्षीय मुकेश अंबानी यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का तुम्हाला?

Please wait..

मुंबई : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि दीर्घकाळ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आज 65 वर्षांचे झाले. जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेली अंबानींची कंपनी RIL याचे सध्या 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप आहे आणि त्यानुसार जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत ती 42 व्या स्थानावर आहे. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सची कमान आपल्या हातात घेतली आणि ती उंचीवर नेली. (Happy Birthday Reliance Chairman Mukesh Ambani)

Advertisement

Advertisement

जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 10व्या स्थानावर आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती 96  अब्ज डॉलर आहे. मुकेश अंबानींचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच रंजक होता. जिथून त्यांचे वडील दिवंगत धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज सोडली होती. तेथून अंबानींनी कंपनीला अशा वळणावर नेले की देशाच्या आणि जगातील मोठ्या कंपन्या त्यांच्या खूप मागे आहेत. विशेष म्हणजे केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्यासमवेत 1981 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम केमिकल्स सुरू केले. त्यानंतर 1985 मध्ये कंपनीचे नाव रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड वरून बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले. पेट्रोलियम व्यतिरिक्त मुकेश अंबानी यांनी दूरसंचार क्षेत्रातही पुढे पाऊल टाकले आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची स्थापना केली.

Advertisement

Advertisement
Loading...

6 जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतली. मात्र, वडिलांचे निधन होताच त्यांचा आणि धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू झाला आणि हा वाद फाळणीपर्यंत पोहोचला. विभाजनअंतर्गत रिलायन्स इन्फोकॉम धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्याकडे गेली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लि. मुकेश अंबानी यांच्याकडे आली. मुकेश अंबानी यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने रिलायन्स इंडस्ट्रीजला देशातील सर्वात मोठी कंपनी बनवले. 2002 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 75,000 कोटी रुपये होते. जे आता मुकेश अंबानी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली 17 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. दुसरीकडे त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कॅपिटल आता विकण्याच्या मार्गावर आहे. ( Mukesh Ambani Happy Birthday Reliance Chairman Turns 65 Read All About One Of The Richest Billionaire In World)

Advertisement

Advertisement

रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी केवळ पेट्रोलियमच नव्हे तर रिटेल, लाइफ सायन्स, लॉजिस्टिक, टेलिकॉम आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रातही दमदार खेळी केली. त्यांची रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी रिटेल व्यवसाय कंपनी आहे आणि अॅमेझॉनला स्पर्धा देत आहे. त्याच वेळी 2016 मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ लाँच केले आणि 2G आणि 3G वर चालणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकून 4G सुविधा देऊन या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आले. मुकेश अंबानींच्या शहाणपणामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने केवळ 58 दिवसांत Jio Platforms चे एक चतुर्थांश भाग विकून 1.15 लाख कोटी रुपये आणि 52,124.20 कोटी रुपये राइट्स इश्यूद्वारे उभे केले. यामुळे कंपनी नियोजित वेळेच्या नऊ महिने आधीच पूर्णपणे कर्जमुक्त झाली. 31 मार्च 2020 अखेर रिलायन्सवर 1,61,035 कोटी रुपयांचे कर्ज होते आणि कंपनीने 31 मार्च 2021 पर्यंत त्याची परतफेड करण्याचे लक्ष्य ठेवले होते. या कामगिरीवर मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनीच्या भागधारकांना दिलेले वचन मी पूर्ण केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply