मुंबई : जर तुम्हाला कमी किंमतीत डेटा आणि कॉल प्लान हवा असेल तर Airtel आणि Jio कडे असे अनेक पर्याय आहेत. दोन्ही कंपन्या 1GB डेटा प्रतिदिन ते 3GB डेटा प्रतिदिन असे अनेक प्लान ऑफर करतात. येथे आम्ही तुम्हाला Reliance Jio आणि Bharti Airtel च्या प्रीपेड प्लान (Prepaid Plan) बद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये 1GB दैनिक डेटा आणि अमर्यादीत कॉल (Unlimited Call) उपलब्ध आहेत.
रिलायन्स जिओचे (Reliance Jio) 3 प्लान आहेत ज्यात दररोज 1GB डेटा आहे. त्यांची किंमत 149 रुपये, 179 रुपये आणि 209 रुपये आहे. 149 रुपयांच्या Jio प्लानमध्ये युजर्सना 20 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा दिला जातो. प्लानमध्ये, तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन मिळते. Jio च्या 179 प्लानमध्ये तुम्हाला 24 दिवसांची वैधता आणि 1GB डेटा दररोज दिला जातो. त्याचप्रमाणे, 209 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 1 GB डेटा मिळतो. या दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100 मेसेज आणि Jio अॅप मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
एअरटेल (Airtel) दररोज 1 जीबी डेटासह अनेक प्लान ऑफर करते. यादीतील पहिला प्लान 209 रुपयांचा आहे आणि 21 दिवसांच्या वैधतेसह (Validity) प्रतिदिन 1 GB डेटा ऑफर करतो. हा प्लान अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिन येतो. दुसरा प्लान 239 रुपयांचा प्लान आहे, जो 24 दिवसांच्या वैधतेसह प्रतिदिन 1GB डेटा ऑफर करतो. यासोबत अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस प्रतिदिन दिले जातात. त्याचप्रमाणे 265 रुपयांचा प्लानही आहे. अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS सह 28 दिवसांसाठी 1GB/दिवस मिळतो. या सर्व योजना विंक म्युझिकच्या प्रवेशासह Amazon Prime Video Mobile Edition ची विनामूल्य चाचणी देखील देतात.