मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला किफायतशीर रिचार्ज प्लान पाहिजे असतो. इंटरनेटची मागणी लक्षात घेऊन सर्व टेलिकॉम कंपन्या जास्तीत जास्त डेटासह प्लान ऑफर करत आहेत. पण तरीही बीएसएनएल या स्पर्धेत इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांपेक्षा आघाडीवर आहे कारण, बीएसएनएल कमी खर्चात जास्त डेटा देत आहे. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये 600 रुपयांपेक्षा कमी दरात दररोज 5GB डेटा मिळतो. विशेष म्हणजे, बीएसएनएलच्या या प्लानसमोर वोडाफोन आणि एअरटेलचे प्लान फारच कमकुवत सिद्ध होतात.
बीएसएनएलच्या 599 रुपयांचा प्लान दररोज 5 जीबी डेटा देतो. प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस दररोज दिले जातात. विशेष म्हणजे प्लानमध्ये ठराविक वेळेत अमर्यादित मोफत डेटाही दिला जातो. याशिवाय, तुम्हाला मोफत Callertune आणि Zing अॅप सबस्क्रिप्शन मिळते.
Vodafone Idea आणि Reliance Jio चा 599 रुपयांचा प्लान, या दोन्ही कंपन्या 599 रुपयांचा प्लान देखील देतात. Vi च्या 599 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 70 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटा ऑफर केला जातो. यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस दिले जातात. प्लानमध्ये Vi Hero Unlimited फायद्यांचाही समावेश आहे ज्यात डेटा डिलाईट्स, वीकेंड रोलओव्हर ऑफरचा समावेश आहे.
एअरटेलच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. या पॅकची वैधता 28 दिवस आहे. या पॅकमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मोफत आहेत. एअरटेल आणि इतर नेटवर्क व्हॉइस कॉल मिनिटे अमर्यादित आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल सांगितले तर डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी सदस्यता 1 वर्षासाठी मोफत मिळते. विंक म्युझिक सदस्यता देखील विनामूल्य आहे. याशिवाय एअरटेलच्या या प्रीपेड प्लानमध्ये HelloTunes, Shaw Academy चा 1 वर्षाचा मोफत ऑनलाइन कोर्स आणि Fastag वर रु. 100 कॅशबॅक यांसारख्या ऑफर देखील देण्यात आल्या आहेत.
BSNL ने आणलाय खास उन्हाळी प्लान; रोजचा खर्च फक्त 6 रुपये; मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे..