Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलबाबत आज घेतला ‘हा’ निर्णय; पहा, काय आहेत इंधनाचे नवीन भाव..

मुंबई : तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आज 16 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज सलग 10 वा दिवस आहे जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच आजही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आजही दिलासा मिळाला आहे. याआधी 6 एप्रिल रोजी इंधनाच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.

Advertisement

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोलचा दर 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये (Kolkata) पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 115.12 रुपये आणि 99.83 रुपये आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये (Chennai) एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 122.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 105.34 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये (Bhopal) एका लिटर पेट्रोलची किंमत 118.14 रुपये आणि डिझेलची किंमत 101.16 रुपये आहे. पाटण्यात (Patana) पेट्रोल-डिझेल अनुक्रमे 116.23 रुपये आणि 101.06 रुपये प्रति लिटर आहे.

Loading...
Advertisement

18 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपये वाढ झाली आहे. देशातील सर्वात खर्चिक पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 123.46 रुपये प्रति लिटर आहे, तर आंध्र प्रदेशात डिझेल 107.61 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर आहे.

Advertisement

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; आज पेट्रोलचे भाव वाढले की घटले..? ; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply