Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेन्शनधारकांसाठी खुशखबर..! मोदी सरकारने घेतलाय ‘हा’ खास निर्णय; पहा, काय होणार फायदा..

दिल्ली : पेन्शनधारकांसाठी (Pensioner) केंद्र सरकारने आज एक खुशखबर दिली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी पेन्शनधारक आणि सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) मदत करण्यासाठी ‘सिंगल-विंडो’ पोर्टल (Single Window Portal) स्थापन करण्याची घोषणा केली. सिंह म्हणाले की, हे पोर्टल देशभरातील निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर सतत संपर्क ठेवण्यासाठीच मदत करेल असे नाही तर त्यांच्या सूचना आणि तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळण्यासाठी सतत प्रयत्न केले जातील.

Advertisement

पेन्शन नियमांचे पुनरावलोकन आणि सुसूत्रीकरण (SCOVA) साठी स्वयंसेवी संस्थांच्या स्थायी समितीच्या (SCOVA) 32 व्या बैठकीत मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, सन 2014 पासून सर्वसामान्यांच्या अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये क्रांतिकारी बदल करण्यात आले आहेत. समान पेन्शन पोर्टलचा उद्देश पेन्शनधारकांच्या सर्व समस्यांचे निराकरण डिजिटल पद्धतीने एकाच ठिकाणी करणे सुनिश्चित करणे आहे. जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या विभागांच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. सरकार पेन्शनपासून पीएफपर्यंत अनेक सुधारणांवर काम करत आहे. विशेषत: पेन्शनधारकांना कोणत्याही तक्रारीसाठी कुठेही ये-जा करताना खूप त्रास सहन करावा लागतो.

Loading...
Advertisement

दरम्यान, छत्तीसगडमध्ये आजपासून जुनी पेन्शन लागू (Old Pension Scheme) करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्य सरकारने जुनी पेन्शन प्रणाली लागू करण्याबाबत आदेश जारी केले आहेत. याबरोबरच नव्या पेन्शन योजनेतील कपातही समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्व विभागाच्या प्रमुखांना पत्रही लिहिले आहे. 9 मार्च रोजी अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा केली होती. राजस्थान, हिमाचल प्रदेश सरकारनेही जुनी पेन्शन लागू केली आहे. अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन बहाल करण्याची मागणी सातत्याने होत आहे.

Advertisement

मोठी खुशखबर..! तब्बल 1 कोटी लोकांची पेन्शन वाढ करण्याची तयारी; पहा, कोणत्या राज्यात सुरू आहे कार्यवाही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply