सरकार शेतकऱ्यांना देणार मोठे गिफ्ट..! ‘या’ राज्यातील सरकारने घेतलाय एकदम खास निर्णय; जाणून घ्या..
दिल्ली : सध्या उत्तर प्रदेश सरकारच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अनेक निर्णय घेताना दिसत आहे. सरकारने सुरुवातीलाच काही महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकर्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल तसेच दलालांचा त्रास सुद्धा कमी होईल. भाजप सरकार एका वर्षात ब्लॉकनुसार 825 FPO स्थापन करणार आहे. ज्यासाठी 354.75 कोटी रुपयांची बजेट तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील 4 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच, प्रत्येक ब्लॉकमध्ये 100 दिवसांत एक विशिष्ट पीक निवडले जाईल.
राज्य सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरुवात केली आहे. वर्ष 2022-23 मध्ये, राज्य सरकार विशिष्ट FPO योजनेअंतर्गत 825 FPO स्थापन करणार आहे. संघटित शेती केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळू शकेल. एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना (Farmer Producer Organisation) हा शेतकऱ्यांचा एक गट आहे. एफपीओ माध्यमातून सामूहिक शेतीला प्रोत्साहन दिले जाईल आणि शेतकऱ्यांना पिकांची विक्री करण्यासाठी बाजारपेठ सहज उपलब्ध होईल. FPO अंतर्गत, सरकार सेंद्रिय शेतीसाठी मदत देखील करेल, ज्यामुळे खते, बियाणे, औषधे आणि कृषी उपकरणे एकाच वेळी खरेदी करणे सोपे होईल. याशिवाय प्रक्रिया युनिट आणि साठवणुकीची व्यवस्था करून पिकाला चांगला भाव मिळू शकतो.
एफपीओ प्रणालीमध्ये मध्यस्थ राहणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल. याबरोबरच राज्य सरकार प्रत्येक विकास गटासाठी 100 दिवसांत एक विशेष पीक निवड करणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी दरम्यान विरोधकांनी भाजपवर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आणि पिकाला योग्य भाव न देण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भाजप राजवटीत शेतकरी गरिबीच्या काळातून जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या अनेक योजनांचा संदर्भ देत भाजपने विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
बळीराजासाठी खुशखबर..! पहा कशा पद्धतीने शेतकरी ठरवू शकणार शेतमालाचा बाजारभाव