भारताने ‘त्या’ मुद्द्यावर अमेरिकेला फटकारले..! म्हटले, आधी युरोपकडे लक्ष द्या; पहा, नेमके काय घडले..
दिल्ली : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) काळात पाश्चात्य देश रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारताला घेराव घालत होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या देशांना सडेतोड उत्तर दिले आहे. एस जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियाकडून तेल आयात करतो. नीट बघितले तर भारत महिन्याभरात जेवढी आयात करतो, तितकेच तेल युरोप तर एकाच दिवसात रशियाकडून आयात करतो.
एएनआय न्यूज एजन्सीनुसार, एस जयशंकर म्हणाले, की ‘जर तुम्ही भारताने रशियाकडून तेल खरेदी (Crude Oil Purchase) केल्याबद्दल म्हणत असाल तर मला असे म्हणायचे आहे, की तुम्ही आधी युरोपकडे लक्ष द्या. इंधनाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तेलाचा काही भाग आयात करतो. पण महिन्याभराचे आकडे बघितले, तर युरोपमध्ये (Europe) आपण महिन्याभरात जेवढे तेल खरेदी करतो तितके तर युरोप एकाच दिवशी खरेदी करत आहे.
रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर एस जयशंकर म्हणाले, की ‘थोडक्यात, आम्ही या संघर्षाच्या विरोधात आहोत. आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीचे समर्थन करतो. हिंसाचार त्वरित थांबावा अशी आमची इच्छा आहे. ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही या दिशेने योगदान देण्यासाठी सर्व प्रकारे तयार आहोत. रशियाकडून तेल आयात करण्यावर निर्बंध नसल्याचे अमेरिकेकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Jo Biden) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यानंतर व्हाइट हाऊसचे सचिव जेन साकी यांनी सांगितले, की रशियाकडून इंधन आयातीवर बंदी घालण्यात आलेली नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करून कोणतेही निर्बंध मोडत नाही. आम्ही समजतो की सर्व देशांनी त्यांचे हित जपले पाहिजे.
रशियाने आतापर्यंत केवळ मार्चमध्ये भारताला दिवसाला 3,60,000 बॅरल तेल निर्यात केले आहे. जे 2021 च्या सरासरीच्या जवळपास चार पट आहे. अहवालात कमोडिटी डेटा आणि अॅनालिटिक्स फर्म केपलरचा हवाला देत असे म्हटले आहे, की रशिया सध्याच्या शिपमेंट शेड्यूलच्या आधारे संपूर्ण महिन्यासाठी भारताला दररोज 2,03,000 बॅरल विकण्याच्या दिशेने काम करत आहे.
त्याचवेळी युक्रेन-रशियाच्या मुद्द्यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले, की हे आव्हान कसे स्वीकारायचे हे भारतानेच ठरवायचे आहे. आमचा विश्वास आहे की सर्व देशांनी विशेषतः ज्यांना रशियाचा फायदा होत आहे, त्यांनी पुतिनवर युद्ध संपवण्यासाठी दबाव आणला पाहिजे. आज आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
फक्त रशिया-युक्रेनच नाही तर जगालाच बसलाय युद्धाचा फटका; पहा, दुसऱ्या देशांचे ‘कसे’ होतेय नुकसान..