Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फक्त रशिया-युक्रेनच नाही तर जगालाच बसलाय युद्धाचा फटका; पहा, दुसऱ्या देशांचे ‘कसे’ होतेय नुकसान..

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला 46 दिवस उलटून गेले आहेत. या दरम्यान युक्रेनमध्ये शहरे उद्ध्वस्त झाली असतानाच दुसरीकडे रशियावर आर्थिक निर्बंधांचा वर्षाव होत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका जगातील अर्थव्यवस्थांना बसला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या आर्थिक अहवालामध्ये अंदाजे आकडेवारी सादर करताना, जागतिक बँकेने कोणत्या देशाचे किती नुकसान झाले आहे आणि जीडीपी किती कमी होऊ शकतो हे सांगितले आहे.

Advertisement

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था यावर्षी 45.1 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज जागतिक बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. रशियाचे युक्रेनविरुद्धचे युद्ध आणि रशियावर पाश्चिमात्य निर्बंधांमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामध्ये म्हटले आहे, की रशिया-युक्रेन युद्धामुळे तीव्र जागतिक मंदी, वाढती महागाई आणि कर्ज यांची काळजी वाढली आहे. अशा परिस्थितीत युरोप आणि मध्य आशिया क्षेत्रातील उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांना याचा फटका सहन करावा लागू शकतो.

Advertisement

या युद्धाचा जगभरात नकारात्मक परिणाम झाल्याचे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. पूर्व युरोप क्षेत्राचा जीडीपी देखील 30.7 टक्क्यांनी घसरू शकतो. पूर्व युरोप प्रदेशात युक्रेन, बेलारूस, किर्गिस्तान आणि मोल्दोव्हा यांचा समावेश होतो. जागतिक बँकेने म्हटले आहे, की रशिया आणि युक्रेन व्यतिरिक्त बेलारूस, मोल्दोव्हा आणि ताजिकिस्तान देखील यावर्षी मंदीच्या गर्तेत येण्याची शक्यता आहे. अर्थशास्त्रज्ञांनी अहवालात सांगितले आहे, की युरोप आणि मध्य आशिया क्षेत्राची अर्थव्यवस्था यावर्षी 4.1 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. याआधी अर्थव्यवस्था तीन टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज होता.

Loading...
Advertisement

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. याचा केवळ युक्रेनवरच वाईट परिणाम होत नाही, तर रशियाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा वाईट परिणाम होत आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी टाकलेल्या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला जोरदार फटका बसला आहे.

Advertisement

युरोप आणि मध्य आशिया क्षेत्रासाठी जागतिक बँकेचे उपाध्यक्ष म्हणाले, की युद्धामुळे उद्भवलेल्या मानवतावादी संकटाची तीव्रता जास्त होती. रशियन आक्रमणामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ते म्हणाले, की युक्रेनला तत्काळ प्रभावाने मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. कारण, ते आपली अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

Advertisement

Russia Ukraine War : आता युक्रेननेही रशियावर केली मोठी कारवाई; रशियाला ‘तसा’ बसणार फटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply