दिल्ली : मार्चमध्ये देशातील इंधनाची मागणी 4.2 टक्क्यांनी वाढून तीन वर्षांच्या सर्वाधिक पातळीवर पोहोचली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कोरोना आधीच्या पातळीपेक्षाही वर गेला आहे. मार्चमध्ये एकूण पेट्रोलियम उत्पादनांचा वापर 19.41 दशलक्ष टन होता, जो मार्च 2019 नंतरचा सर्वाधिक आहे.
कोविड-19 साथरोगाच्या लाटेनंतर मार्चमध्ये इंधनाची मागणी वाढली. डिझेल हे देशात सर्वाधिक वापरले जाणारे इंधन आहे. जे सर्व पेट्रोलियन पदार्थांच्या वापरापैकी 40 टक्के आहे, डिझेलची मागणी 6.7 टक्क्यांनी वाढून 7.7 दशलक्ष टन झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कोविड पातळी पार केलेल्या पेट्रोलची विक्री 6.1 टक्क्यांनी वाढून 2.91 दशलक्ष टन झाली. मार्चमध्ये, दोन्ही इंधनांची मागणी कोरोनापूर्व पातळीपेक्षा जास्त होती. मार्चमध्ये एलपीजी गॅसची मागणी 9.8 टक्क्यांनी वाढून 2.48 दशलक्ष टन झाली.
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात इंधनाची मागणी 4.3 टक्क्यांनी वाढून 202.71 दशलक्ष टन झाली, जी 2020 या आर्थिक वर्षानंतर सर्वाधिक आहे. वाहन आणि स्वयंपाकाच्या इंधनाचा वापर वाढला, तर औद्योगिक इंधन कमी झाले. 2021-22 मध्ये पेट्रोलचा वापर 10.3 टक्क्यांनी वाढून 30.85 दशलक्ष टन झाला, तर डिझेलची विक्री 5.4 टक्क्यांनी वाढून 76.7 दशलक्ष टन झाली. आर्थिक वर्ष 2022 मध्ये पेट्रोलची मागणी आतापर्यंत सर्वाधिक होती तर डिझेलची विक्री 2019-20 मध्ये 82.6 दशलक्ष टन वापरानंतर सर्वाधिक होती. एलपीजी गॅसचा वापर 3 टक्क्यांनी वाढून 28.33 दशलक्ष टन झाला आहे. जेट इंधन किंवा एटीएफची मागणी 35 टक्क्यांनी वाढून 5 दशलक्ष टन झाली, परंतु कोरोनापूर्व वर्षात वापर 8 दशलक्ष टनांपेक्षा कमी होता.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर अंकुश ठेवला आहे. तेल कंपन्यांनी सोमवारी राजधानी दिल्लीसह देशातील चारही मोठी शहरे आणि प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या. दिल्लीत पेट्रोलचा दर अजूनही 105.41 रुपयांवर कायम आहे, तर मुंबईत 120.51 रुपये आहे. डीलर्सचे म्हणणे आहे, की जागतिक बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्या आसपास आले आहे. जे काही दिवसांआधी 117 डॉलर होते. यामुळेच आता कंपन्यांनी किमती वाढ करणे बंद केले आहे. सध्या तरी आणखी दरवाढ होण्याची शक्यता दिसत नाही.
कच्चे तेल घसरले..! पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय; पहा, इंधनाचे भाव वाढले की घटले..