Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता ब्रिटेन आणि कॅनडा रांगेत..! ‘त्यासाठी’ भारताने तयार केलाय खास प्लान; पहा, काय होणार फायदा..

दिल्ली : गेल्या काही वर्षात भारताने जागतिक पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. विकसित देशांनाही आता भारताचा प्रथम विचार करावा लागत आहे, अशी परिस्थिती सध्या आहे. भारतानेही आता आणखी मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. भारत यावर्षी ब्रिटन आणि कॅनडा या आणखी दोन विकसित देशांशी व्यापार करार करू शकतो. मुक्त व्यापार करारासाठी या दोन देशांबरोबर चर्चा सुरू आहे. ब्रिटनबरोबर (Britain) दोन टप्प्यातील व्यापार चर्चाही पूर्ण झाली असून चर्चेचा तिसरा टप्पा या महिन्यात सुरू होऊ शकतो. वाणिज्य सचिवांच्या नेतृत्वात एक पथक या महिन्यात ब्रिटेनचा दौरा करणार आहे. त्याचबरोबर कॅनडाबरोबर (Canada) व्यापार चर्चाही सुरू झाली आहे.

Advertisement

विकसित देशांबरोबरच्या व्यापार करारामुळे भारताची निर्यात जलद गतीने वाढेल, ज्यामुळे आर्थिक विकासाचा वेगही वाढेल. व्यापार करारामुळे भारतीय वस्तू विकसित देशांच्या बाजारपेठेत शुल्क मुक्त होतील, ज्यामुळे भारतीय वस्तू या देशांच्या बाजारपेठेत स्वस्त होतील आणि त्यांची मागणी वाढेल. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले आहे, की एखादा देश तेव्हाच विकसित होऊ शकतो जेव्हा त्याचा विदेशी व्यापारात मोठा वाटा असेल. या प्रकारच्या व्यापार करारामुळे परकीय व्यापारात भारताचा वाटा वाढेल. ते म्हणाले की, विविध देशांबरोबर व्यापार करार करताना वेगवेगळ्या अटी व शर्ती लक्षात ठेवल्या जात आहेत.

Advertisement

गोयल म्हणाले की, ब्रिटन उत्पादनातही पुढे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नोव्हेंबरपर्यंत ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करार होणे अपेक्षित आहे. कॅनडाची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. कदाचित आधी ब्रिटनबरोबर अंतरिम करार होईल. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन या महिन्याच्या अखेरीस भारत दौरा करतील अशी शक्यता आहे. या दौऱ्या दरम्यान भारत-ब्रिटेन व्यापार कराराची कालमर्यादा स्पष्ट होऊ शकेल.

Loading...
Advertisement

तज्ज्ञांच्या मते, ब्रिटनबरोबर व्यापार करार झाल्यानंतर युरोपियन युनियनशी (European Union) व्यापार (Trade) करार करणे सोपे होईल. भारताने युरोपियन युनियनशीही व्यापार करारासाठी चर्चा सुरू केली आहे. सन 2021 मध्ये, भारताने ब्रिटेनला $10.37 अब्ज किमतीच्या वस्तू निर्यात (Export) केली, तर या कालावधीत भारताने ब्रिटनमधून $6.7 अब्ज किमतीच्या वस्तू आयात (Import) केली. सन 2021 मध्ये, भारताने कॅनडाला $3.5 अब्ज किमतीच्या वस्तू निर्यात केली. या कालावधीत भारताने कॅनडाकडून 2.7 अब्ज डॉलरची आयात केली.

Advertisement

रशियाच्या मदतीसाठी भारतही करतोय जोरदार हालचाली; पहा, काय सुरू आहे व्यापार विश्वात..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply