Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. तर श्रीलंकेत येऊ शकते आणखी मोठे संकट; पहा, डॉक्टरांंनी कोणता इशारा दिलाय..?

दिल्ली : श्रीलंकेतील सध्याचे आर्थिक संकट कोरोनापेक्षाही घातक ठरू शकते. कारण, देशात जीवरक्षक औषधांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. ही औषधे संपत असल्याचा इशारा डॉक्टरांनी रविवारी दिला. सध्या श्रीलंकेत वीज, पाणी, इंधन आणि अन्नधान्याची तीव्र टंचाई आहे. याशिवाय औषधांचीही कमतरता जाणवत आहे.

Advertisement

श्रीलंका मेडिकल असोसिएशनने सर्व रुग्णालयांना सांगितले आहे, की आता आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांची तीव्र कमतरता आहे. याशिवाय औषधांचाही पुरवठा होत नाही. गेल्या महिनाभरापासून नियमित शस्त्रक्रिया होत नाहीत. औषधांअभावी तातडीची शस्त्रक्रियाही होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Advertisement

एएफपीच्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या संघटनेचे म्हणणे आहे, की त्यांनी सर्व माहिती पत्राद्वारे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना दिली आहे. या पत्रात म्हटले आहे की, काही दिवसांत औषधांचा आणि उपकरणांचा पुरवठा सुरळीत न झाल्यास तो साथीच्या रोगापेक्षाही घातक ठरेल त्यामुळे या संकटावर मार्ग काढण्यासाठी तातडीने हालचाली करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, श्रीलंकेवर चीन, जपान, भारत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची मोठी कर्जे आहेत, पण परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे ते कर्जाचा हप्ताही भरू शकत नाही. श्रीलंकेवर जवळपास 45 अब्ज डॉलर (सुमारे 3 लाख 42 हजार कोटी रुपये) कर्ज आहे. अशाप्रकारे श्रीलंका सरकारसमोर दुहेरी आव्हान आहे. एकीकडे त्याला परकीय कर्ज द्यावे लागत आहे आणि दुसरीकडे देशाला संकटातून बाहेर काढायचे आहे.

Advertisement

विशेष म्हणजे 2.2 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक खाद्यपदार्थ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळत नसल्याने प्रचंड हैराण झाले आहेत. आर्थिक संकटाबरोबरच देशात ऊर्जा संकटही आहे. अहवालानुसार, देशात दररोज दहा तासांपेक्षा जास्त वीज कपात केली जात आहे. यामुळे संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर उतरत केलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्यावरील दबाव वाढला आहे. श्रीलंका आता पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

चिन्यांचा खतरनाक खेळ..! फक्त श्रीलंकाच नाही तर तब्बल ‘इतके’ देश अडकलेत ‘त्या’ सापळ्यात..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply