Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारीच आहे की..! फक्त 11 हजार करा नवी कार बुक; ‘ही’ कंपनी आणतेय दमदार कार..

मुंबई : मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांना देशात जबरदस्त मागणी आहे. कंपनीने आणखी एक शानदार कार लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, ही नवी कार तुम्ही फक्त 11 हजार रुपयांत बुक करू शकता. कंपनी देशात या प्रसिद्ध MPV कारचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार आहे. या कारच्या बुकिंगसाठी तुम्हाला 11 हजार रुपये जमा करावे लागतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Ertiga च्या तीन आवृत्त्या आहेत म्हणजेच ही कार पेट्रोल, डिझेल आणि CNG मध्ये उपलब्ध होती. BS6 नियम आल्यानंतर त्याच्या डिझेल व्हर्जनवर बंदी घालण्यात आली. पण या सेगमेंटमध्ये सीएनजी व्हेरिएंट मिळवणारी ही एकमेव एमपीव्ही कार आहे. गेल्या चार वर्षांपासून, MPV Ertiga सतत आपल्या खरेदीदारांमध्ये वाढ करत आहे आणि यावर्षी कारने एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. सध्या ते रेनॉल्ट ट्रायबर, महिंद्रा आणि किया केरेन्स सारख्या वाहनांना जबरदस्त टक्कर देत आहे.

Advertisement

नवीन Ertiga पुढील आठवड्यात बाजारात दाखल होणार आहे. पुढच्या पिढीतील Ertiga मध्ये स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञान, 1.5-लीटर पेट्रोल इंजिन, अपग्रेडेड पॉवरट्रेन, प्रगत 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील. हे मॉडेल सीएनजी पर्यायासह देखील उपलब्ध असेल.

Advertisement

दरम्यान, गेल्या काही वर्षांत देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. आता कर्नाटकातही इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी आली आहे. 2020 च्या तुलनेत येथे गेल्या वर्षी इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) नोंदणीत 242% वाढ झाली आहे, ज्यामुळे राज्यातील एकूण इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आता 90,000 पेक्षा जास्त झाली आहे.

Loading...
Advertisement

2021 मध्ये देशातील नोंदणीकृत सर्व इलेक्ट्रिक वाहनांपैकी 10 टक्क्यांपेक्षा जास्त कर्नाटकचा वाटा होता, त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. कर्नाटकात सुमारे 33,307 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आणि 66,707 उत्तर प्रदेशमध्ये. दोन्ही राज्यांमध्ये मिळून नोंदणीकृत ईव्हीचा वाटा 31 टक्के आहे. दोन्ही राज्यांमध्ये 3.2 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटातही जोरदार कार खरेदी..! पहा, फेब्रुवारी महिन्यात कार कंपन्यांनी किती कार विक्री केली..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply