Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ग्रामीण उद्योजकतासाठी मिळालाय सव्वाचार कोटींचा निधी; पहा, कशासाठी होणार इतका खर्च

मुंबई : ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम या योजनेसाठी निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार या योजनेसाठी सन २०२१ २२ मध्ये ४ कोटी २० लाख ६० हजार ८३३ इतका निधी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास वितरीत करण्यात येणार आहे. या अनुदानातून विविध उपक्रम आणि आवश्यक खर्च करण्यात येणार आहे. अनुदानाचे पैसे कोणत्या कारणांसाठी खर्च करायचे आहेत, याचीही माहिती देण्यात आली आहे. याच गोष्टींवर पैसे खर्च करण्याच्या सूचना आहेत.

Advertisement

केंद्र आणि राज्य सरकार राज्यात अनेक विकासाच्या योजना राबवत आहेत. देशात आजमितीस बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संकटात लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. अशा परिस्थितीत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, स्वयंरोजगाराच्या प्रमाणात वाढ करणे या गोष्टी महत्वाच्या  आहेत. त्यामुळे दोन्ही सरकारांनी या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले  आहे. रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नव्याने काही योजना सुरू केल्या आहेत. तसेच आधीच्या योजना आहेत त्या पूर्ण करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

Loading...
Advertisement

यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत आहे. सरकारने आता ग्रामीण उद्योजकता विकासासाठी निधी दिला आहे. कोरोनानंतर शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरी भागात आता कोरोनानंतर रोजगाराच्या प्रमाणात पुन्हा वाढ होत आहे. मात्र ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करुन देता येतील याचा विचार सरकार पातळीवर सुरू आहे.

Advertisement

नगर जिल्ह्यासाठी १८४ कोटींचा निधी प्राप्त; पहा कशासाठी होणार आहे इतका खर्च

Advertisement
Advertisement

Leave a Reply