Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियालाही बसताहेत युद्धाचे चटके.. देशातील लोकांसमोर आलेय ‘हे’ मोठे संकट; पहा, काय घडतेय..

दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये 42 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात केवळ युक्रेनच उद्ध्वस्त झालेला नाही, तर रशियाचे लोकही या संकटाने हैराण झाले आहेत. जगभरातील देशांच्या कठोर आर्थिक निर्बंधांमुळे रशियातील सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. रशियामध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती 45% पर्यंत वाढल्या आहेत. इतकेच नाही तर दूरसंचार, वैद्यकीय, ऑटोमोबाइल, कृषी आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या किमतीही अत्यंत वेगाने वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

बीबीसीच्या अहवालानुसार, आर्थिक निर्बंधांमुळे रशियन चलन रुबलचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 30 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. अशा परिस्थितीत, रशियामध्ये खाद्य पदार्थांच्या किंमती 45% वाढल्या आहेत. आधी 3,500 रुपयांना मिळणारे किराणा सामान आता 5,100 रुपयांना मिळत आहे.

Advertisement

रशियातील अनेक दुकानांमध्ये लोकांच्या वस्तू खरेदीवरही बंदी घातली जात असल्याचा दावाही काही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. रशिया देखील एक मोठी इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ आहे. परंतु, निर्बंधांमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती देखील 17% वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे लॅपटॉप, ऑटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. ऑनलाइन व्यवहारांची सर्वात मोठी संस्था असलेल्या SWIFT मधून बाहेर केल्यानंतर रशियाची अर्थव्यवस्था कोलमडत चालली आहे. सध्या रशियन चलन डॉलरच्या तुलनेत 112 वर व्यवहार करत आहे. या कारणामुळे रशियाच्या बँकेने 7.65 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर बंदी टाकली आहे. यामुळेच रशियात बँका आणि एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

Loading...
Advertisement

दरम्यान, याआधी जी-7 देशांनी रशियाच्या सेंट्रल बँकेला व्यवहारात सोन्याचा वापर करण्यास बंदी घातली होती. युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) मांडलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. युक्रेन संघर्षातून रशिया लष्करी आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत होईल, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यावेळी म्हटले होते. जपान अतिरिक्त 25 रशियन व्यक्तींची मालमत्ता गोठवेल आणि 81 रशियन संस्थांच्या निर्यातीवर बंदी टाकेल, असे जपानी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते.

Advertisement

तेल-गॅस उत्पादक देशांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वितरणात वाढ करण्याचे आवाहन करा. तेल आणि वायू उत्पादनात ओपेकची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, G-7 नेत्यांनी तेल आणि वायू उत्पादक देशांना जबाबदारीने वागण्याचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वितरणात वाढ करण्याचे आवाहन केले, G-7 नेत्यांनी एका निवेदनात म्हटले होते.

Advertisement

…तरीही युरोपला रशियाचाच आधार..! युरोपातील 15 देश करताहेत ‘हे’ काम; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply