Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तेल कंपन्यांची ‘अशी’ ही मनमानी..! कच्चे तेल होतेय स्वस्त, तरीही इंधन दरवाढ थांबेना; पहा, काय आहे तेलाचे गणित..

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी होत आहेत, तरीही देशातील तेल कंपन्यांनी इंधनाची दरवाढ सुरुच ठेवली आहे. आज बुधवारी सुद्धा पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. तर, 24 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान, देशाच्या कच्च्या तेलात 14 डॉलरपर्यंत घसरण झाली.

Advertisement

तेव्हापासून, भारतीय क्रूड बास्केटची किंमत प्रति बॅरल $103 वर स्थिर आहे. सोमवारी सीएनजीच्या दरातही अडीच रुपयांनी वाढ करण्यात आली. त्याची किंमत 64.11 रुपये प्रति लीटर झाली होती. तर तेल कंपन्यांच्या भूमिकेमुळे दर आणखी वाढले आहेत. काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन सुरू केले असून ते 7 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचबरोबर वाढत्या किमतीच्या विरोधात संसदेत अनेकदा गदारोळ उडाला आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पेट्रोल 122.67 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. देशभरात या शहरात पेट्रोलचे दर सर्वात जास्त असल्याचे मानले जाते. नाशिक जिल्ह्यातील मनमाड आगारातून 400 किमी अंतरावरावरुन इंधन आणले जाते, त्यामुळे परभणीत पेट्रोलचे दर सर्वात जास्त असल्याचे सांगितले जाते. पेट्रोलच्या वाहतुकीवर प्रति लिटर 2.07 रुपये अधिक खर्च होत आहे. मनमाडहून परभणीला जाण्यासाठी तेलाच्या टँकरला 24 हजार रुपये लागतात.

Loading...
Advertisement

दीर्घकालीन शून्य-कार्बन उत्सर्जन लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भारताला $17.77 ट्रिलियनची आवश्यकता असेल. यासाठी $12.4 ट्रिलियनचे अतिरिक्त भांडवल उभे करावे लागेल. ब्रिटिश कर्जदार स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने अभ्यासात म्हटले आहे की, जर ही भांडवली तफावत बाह्य स्त्रोतांकडून भरली गेली, तर घरगुती खर्च $79 ट्रिलियनने वाढेल. त्यात म्हटले आहे की, हवामान उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारताला $17.77 ट्रिलियनपैकी $85 ट्रिलियनची ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल. ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रात $6 ट्रिलियनची गुंतवणूक आवश्यक आहे, ज्यामध्ये उद्योग, वाहतूक आणि इमारत यांचाही समावेश आहे.

Advertisement

अर्र.. सर्वसामान्यांना झटका: आज पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ; जाणुन घ्या लेटेस्ट दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply