Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. सर्वसामान्यांना झटका: आज पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ; जाणुन घ्या लेटेस्ट दर

दिल्ली – इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. बुधवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel price) प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. या वाढीनंतर 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर 104.61 रुपये प्रति लिटरवरून 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.87 रुपयांवरून 96.67 रुपये प्रति लिटर झाला आहे.

Advertisement

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. जवळपास 137 दिवस स्थिर राहिल्यानंतर 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 14व्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे.

Advertisement

श्रीनगरपासून कोचीपर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आता 105 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे. झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये डिझेलने शतक ओलांडले आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल सर्वात महाग म्हणजे 107.11 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. त्याचवेळी, राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक म्हणजे 122.93 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोल 120.51 आणि डीझेल 104.77 प्रति लिटरवर पोहोचले आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

तुमच्या शहराचे दर याप्रमाणे तपासा

Advertisement

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड>  9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 922201122या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक आरएसपी<डीलर कोड>  9223112222या क्रमांकावर पाठवू शकतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply