Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वा.. रे.. सरकार..! इंधन दरवाढीने लोक होताहेत हैराण… सरकार म्हणतयं, ‘इतकेच’ वाढलेत भाव; पहा, काय आहे प्रकार..

मुंबई : देशात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या किंमतीवरज केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. मंगळवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, देशातील तेलाच्या किमतीत वाढ हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय कारणांमुळे आहे. ते म्हणाले की, देशात तेलाच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या 15 दिवसांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 13 वेळा वाढल्या आहेत. दरम्यान, दोन्ही इंधन 9.20 रुपयांनी वाढले आहे. मुंबईत सध्या पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे.

Advertisement

लोकसभेत झालेल्या चर्चे दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, देशातील इंधनाच्या किमतीत वाढ ही इतर देशांतील किमतींच्या 1/10 टक्के आहे. एप्रिल 2021 ते 22 मार्च दरम्यान, इंधनाच्या किंमती अमेरिकेत 51 टक्क्यांनी, कॅनडामध्ये 52 टक्के, जर्मनीमध्ये 55 टक्के, यूकेमध्ये 55 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के आणि स्पेनमध्ये 58 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यातुलनेत देशात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

दिल्लीत पेट्रोलचा दर आता 104.61 रुपये प्रतिलिटर झाला आहे, तर डिझेलचा दर 95.87 रुपये झाला आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल 119.67 रुपये आणि डिझेल 103.92 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय कोलकाता पेट्रोल 114.28 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लिटर, तर चेन्नईमध्ये 110.11 रुपये आणि डिझेल 100.19 रुपये प्रति लिटर झाले आहे. विशेष म्हणजे, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 4 नोव्हेंबर 2021 पासून 21 मार्च 2022 पर्यंत स्थिर होत्या. 22 मार्चपासून त्यात वाढ होऊ लागली, ज्यामुळे देशातील सामान्य लोकांवर हळूहळू ताण वाढत आहे.

Loading...
Advertisement

हे लक्षात घेण्यासारखे आहे, की याआधीही तेलाच्या किमतींवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता, तेव्हा पेट्रोलियम मंत्र्यांनी इंधनाच्या दरवाढीवरून सरकारच्या समर्थनात मत व्यक्त केले होते. तेव्हा त्यांनी म्हटले होते, की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आपल्याकडे इंधनाचे भाव वाढले आहेत. लोकांना किफायतशीर दरात इंधन देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.

Advertisement

सर्वसामान्यांना झटका:पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ;जाणून घ्या नवीन दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply