Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. लवकरच येतेय यामाहाची जबरदस्त मोटारसायकल; पहा, कंपनीने कोणते दिलेत फिचर..

मुंबई : देशात सध्याच्या काळात अनेक नवीन दुचाकी येत आहेत. आताही यामाहा कंपनीची एक दमदार मोटारसायकल लवकरच लाँच होणार आहे. या दुचाकीसाठी बुकिंगही सुरू झाले आहे. yamaha MT 15 V2.0 मोटारसायकलचे लवकरच लाँच होणार आहे. कारण निवडक पुरवठादारांनी या नवीन दुचाकीसाठी टोकन रकमेवर बुकिंग घेणे सुरू केले आहे. याआधी विकले गेलेले MT15 V1 फार आधीच बंद केले होते. कंपनीने या नवीन दुचाकीबाबत फारशी माहिती अजून दिलेली नाही. मात्र, डीलरच्या सूत्रांचे म्हणणे आहे की या महिन्याच्या अखेरीस दुचाकीची किंमत जाहीर होण्याची शक्यता आहे.

Advertisement

अद्ययावत सस्पेन्शन किट व्यतिरिक्त मोटारसायकलला YZF-R15 V4 फेयरी दुचाकीप्रमाणे क्विक-शिफ्टर आणि ट्रॅक्शन कंट्रोल देखील मिळू शकते. याशिवाय, कंपनी मोटारसायकलचा लूक आणि डिझाइन अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्याच्या बाह्य डिझाइनमध्ये किरकोळ बदल देखील करू शकते. नवीनतम अपडेटसह दुचाकीच्या पॉवरट्रेनमध्ये कोणतेही बदल केले जाण्याची शक्यता नाही. याला आधीप्रमाणेच 155cc, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळत राहील. हे इंजिन YZF-R15 मध्ये देखील वापरले जाते. हे इंजिन VVA तंत्रज्ञानासह येते आणि ते 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजिन 10,000rpm वर 18.1 bhp ची कमाल पॉवर आणि 7,500rpm वर 14.2 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Loading...
Advertisement

या मोटारसायकलच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, लवकरच कंपनी दुचाकीची किंमत जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.  सध्या मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या दुचाकी आल्या आहेत. इलेक्ट्रिक कंपन्यांच्याही स्कूटर लाँच होत आहेत. कोरोनानंतर बाजारपेठेत मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून कंपन्यांनी नवीन वाहने बाजारात आणण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

‘यामाहा’ ची दमदार स्कूटर..! मायलेजमध्येही आहे एकदम जबरदस्त; पहा, काय आहेत हटके फिचर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply