Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबादकरांसाठी खुशखबर..! ‘ती’ फिल्म कंपनी करणार आहे 140 कोटींची गुंतवणूक

Please wait..

औरंगाबाद : पॅकेजिंग वस्तू बनवणारी कॉस्मो फिल्म्स औरंगाबादमध्ये 140 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने सीपीपी फिल्म प्रोडक्शन लाइन उभारणार आहे. कंपनीने शनिवारी सांगितले की, ती अंतर्गत जमा आणि कर्जाद्वारे या उत्पादन लाइनवर 140 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Advertisement
Loading...

कॉस्मो फिल्म्सने सांगितले की त्यांनी या विस्तारासाठी वाळूजमध्ये जमीन देखील खरेदी केली आहे. नवीन उत्पादन लाइनची वार्षिक क्षमता 25,000 मेट्रिक टन असेल. कंपनीचे ग्लोबल सीईओ पंकज पोद्दार म्हणाले की, जगभरात पॅकेजिंग फिल्म पुन्हा वापरण्यायोग्य आणि टिकाऊ बनविण्यावर भर दिला जात आहे. हे लक्षात घेऊन नवीन उत्पादन लाइन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Cosmo Films To Invest Rs 140 Cr In Aurangabad)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply