Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Vodafone-Idea एक पाऊल पुढे..! महिनाभरासाठी आणलेत ‘हे’ दोन शानदार प्लान; चेक करा, डिटेल

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमध्ये आता एक महिना वैधता असलेले प्लान आणण्यात स्पर्धा सुरू झाली आहे. सर्वात आधी रिलायन्स जिओने 28 दिवसांऐवजी पूर्ण महिनाभर वैधता असलेले प्लान लाँच केले. त्यानंतर काहीच दिवसात एअरटेलनेही असे दोन प्लान लाँच केले. त्यानंतर आता Vodafone Idea ने सुद्धा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 30 दिवसांचे आणि 31 दिवसांचे रिचार्ज प्लान जोडले आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे 327 आणि 337 रुपये आहे.

Advertisement

हे TRAI च्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर लाँच करण्यात आले आहे. ज्यामध्ये दूरसंचार कंपन्यांना किमान 30 दिवस वैधता असलेला आणि एक पूर्ण महिना वैधता असलेला प्लान आणण्यास सांगितले आहे. कंपनीने 327 आणि 337 रुपयांचे रिचार्ज प्लान Airtel आणि Jio च्या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लानला टक्कर देण्यासाठी लाँच केले आहेत.

Advertisement

327 रुपयांच्या रिचार्ज प्लान 30 दिवसांची वैधता मिळते. हा प्लान 25GB 4G हाय-स्पीड डेटासह येतो. संपूर्ण रिचार्ज कालावधी दरम्यान युजर्सना विनामूल्य व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. दररोज 100SMS कालबाह्य झाल्यानंतर SMS शुल्क आकारले जाते. याव्यतिरिक्त Vi Movies & TV अॅप मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Loading...
Advertisement

कंपनीचा 337 रिचार्ज हा 31 दिवसांच्या वैधतेचा प्लान आहे. हा पॅक 28GB 4G हाय-स्पीड डेटासह येतो. 337 रुपयांच्या रिचार्जसह युजर्सना संपूर्ण प्लान कालावधीसाठी अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याव्यतिरिक्त प्लान Vi Movies आणि टीव्ही अॅपसाठी विनामूल्य सदस्यता ऑफर करतो.

Advertisement

Airtel आणि Jio ने अजून 31 दिवसांची वैधता योजना जाहीर केलेली नाही. दोन्ही कंपन्या 296 रुपयांमध्ये 30 दिवसांची वैधता योजना देत आहेत. Jio आणि Airtel प्लानमध्ये मोफत व्हॉइस कॉल, 25 GB डेटा आणि SMS फायदे उपलब्ध आहेत. दुसरीकडे Vi चा 30 दिवसांचा प्लान 327 रुपयांचा असून यामध्ये 28GB डेटा, फ्री कॉल आणि 100 SMS दिले जात आहेत. Jio च्या प्लानमध्ये Jio अॅप सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे तर 296 रुपयांच्या Airtel रिचार्ज प्लानमध्ये Wynk म्युझिक सब्सक्रिप्शन, Amazon Prime Video Mobile Edition ट्रायल पॅक, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि बरेच काही आहे.

Advertisement

अर्र.. जिओलाही बसलाय जोरदार झटका; एअरटेलने केलीय जबरदस्त कामगिरी; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply