Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी खुशखबर..! पैसे नसले तरीही मिळेल रेल्वेचे तिकीट; पहा, काय आहे भन्नाट आयडीया..

मुंबई : रेल्वे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. होय, हे खरे आहे कारण पेटीएम तुम्हाला ही सुविधा देत आहे. खरेतर, पेटीएम पेमेंट गेटवे (Paytm PG) युजर आता प्लॅटफॉर्मवर पेटीएम पोस्टपेड लाँच करून IRCTC तिकीट सेवेवर ‘आता बुक करा, नंतर पैसे द्या’ (book now pay later) याचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement

म्हणजेच, पेटीएम पोस्टपेड युजर नंतर रक्कम भरण्याचा पर्याय निवडून त्यांची तिकिटे IRCTC द्वारे बुक करू शकतील. ही सुविधा शेकडो लोकांसाठी वरदान ठरू शकते कारण युजर तत्काळ पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकतील. कंपनीने म्हटले आहे, की युजर्सनी आता खरेदी करा, नंतर पैसे द्या या सुविधेचा वापर केला आहे कारण ही सुविधा तिकीट बुक करणे, बिले भरणे किंवा खरेदी करणे असो त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात.

Loading...
Advertisement

Paytm पोस्टपेड 30 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी 60 हजार रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त क्रेडिट ऑफर करते. युजर्स देयक सायकलच्या शेवटी संपूर्ण रक्कम भरू शकतात किंवा सोयीस्कर पेमेंटसाठी त्यांचे बिल ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतात. पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​सीईओ प्रवीण शर्मा म्हणाले, की “आम्ही युजर्सना अखंड डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उपाय ऑफर करण्याचा प्रयत्न करतो. पेटीएम पोस्टपेड (BNPL) आता IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असेल. IRCTC सह भागीदारीद्वारे, Paytm PG युजर्सना तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नंतर पैसे देण्याच्या पर्यायासह अखंड आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट ऑफर करण्यात येईल.

Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..! तब्बल ‘इतक्या’ रेल्वे स्टेशनवर मिळतेय मोफत वाय-फाय; पहा, कसा होणार फायदा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply