Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. चारचाकीनंतर आता दुचाकी..! 5 एप्रिलपासून खिशाला झटका देणार ‘या’ कंपनीच्या दुचाकी..

मुंबई : दुचाकी वाहन निर्माता कंपनी Hero MotoCorp ने 5 एप्रिलपासून आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती 2,000 रुपयांनी वाढ करणार असल्याचे सांगितले आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती या दरवाढीला कारणीभूत ठरल्या आहेत. या दरवाढीचा परिणाम कंपनी अंशतः भरून काढणार आहे. त्यामुळे या काळात हिरो कंपनीच्या दुचाकी खरेदी करण्याचा प्लान करणाऱ्या लोकांना झटका बसणार आहे.

Advertisement

दरवाढ दोन हजार रुपयांपर्यंत असली तरी, वाढीचे योग्य प्रमाण मॉडेल आणि बाजारनिहाय असेल. Hero MotoCorp कंपनी आता टोयोटा किर्लोस्कर मोटर, ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या दरवाढ करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे. या कंपन्यांनी अन्य खर्च वाढल्यामुळे पुढील महिन्यापासून किमती वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यात, BMW ने घोषणा केली की कंपनी 1 एप्रिलपासून तिच्या सर्व मॉडेल्सच्या किमती 3.5% पर्यंत वाढ करेल. कंपनीने सांगितले की, भौगोलिक-राजकीय प्रभावाशिवाय वाढती सामग्री आणि किंमत टिकवून ठेवण्यासाठी किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. मर्सिडीजही 1 एप्रिलपासून आपल्या उत्पादनांच्या किमतीत सुमारे तीन टक्क्यांनी वाढ करत आहे. कंपनीने सांगितले, की कारची किंमत किमान 50 हजार रुपयांनी वाढ केली जाऊ शकते, जी 5 लाखांपर्यंत जाऊ शकते. कच्च्या मालासह किमतीत वाढ झाल्यामुळे टोयोटा किर्लोस्कर देखील 1 एप्रिलपासून मॉडेलच्या किमती चार टक्क्यांनी वाढ करणार आहे. मात्र, वाढत्या खर्चाचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) आणि बॅटरी उत्पादकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि जीवनावश्यक घटकांच्या किमती वेगाने वाढत आहेत. जेव्हा देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जास्त असेल तेव्हा ही अडचण आणखी वाढू शकते, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत वाढू शकते, असे सांगण्यात आहे. तसे पाहिले तर सध्याच्या परिस्थितीत या वाहनांच्या किंमती खूप जास्त आहेत. त्यामुळे जास्त मागणी मिळत नाही. त्यात सरकारकडून अनुदान दिले जात आहे. त्यामुळे किंमती काही प्रमाणात कमी होतात. अशी परिस्थिती असताना किंमती वाढल्या तर वाहनांच्या मागणीत घट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

चारचाकीचे स्वप्न आणखी खर्चिक..! आता ‘या’ कंपनीने दिलाय बजेटला झटका; पहा, किती केलीय दरवाढ..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply