Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काय सांगता..! फक्त 20 पैशात चालणार एक किलोमीटर.. पहा, कोणत्या कंपनीने केलाय हा दावा..

मुंबई : पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 रुपयांवर पोहोचले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमतींमुळे कार किंवा दुचाकी चालवणे कठीण होत चालले आहे. मध्यमवर्गीय लोक वाहने चालवणे टाळतात. दुचाकीच्या तुलनेत स्कूटरची सरासरी खूप कमी असते. आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या स्कूटर्स सरासरी 45 किमी प्रतिलिटर देत आहेत. दिल्लीसारख्या रहदारी असलेल्या शहरात ही सरासरी आणखी कमी होते. अशा परिस्थितीत जर फक्त 20 पैशात किलोमीटरचा मायलेज मिळाला तर. ऐकण्यास आश्चर्य वाटते ना.. पण, एक कंपनी आहे जिने अशक्य वाटणारा दावा केला आहे.

Advertisement

इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी होप इलेक्ट्रिकचा (Hop Electric) दावा आहे, की त्यांच्या सध्याच्या ई-स्कूटरची चालण्याची किंमत सुमारे 20 पैसे प्रति किमी आहे, जी पेट्रोल स्कूटरपेक्षा खूप कमी आहे. HOP LEO इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 72,500 रुपये आणि HOP LYF ची किंमत 65,500 रुपये आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की या इलेक्ट्रिक स्कूटर एका वेळेस पूर्ण चार्जिंगमध्ये 125 किमी पर्यंत रेंज देतात. यात 72V आर्किटेक्चर, जास्त कार्यक्षमता मोटर आहे.

Advertisement

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंटरनेट, जीपीएस आणि मोबाइल अॅप सारखी कनेक्टेड फीचर्स देण्यात आली आहेत. HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने जयपूरमध्ये HOP मेगाप्लेक्स सुरू केले आहे. होपने उत्पादन क्षमता वार्षिक 1.80 लाख युनिट्सपर्यंत वाढ केली आहे. HOP सध्या मेगाप्लेक्स येथे HOP LEO आणि HOP LYF या इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन करत आहे.

Loading...
Advertisement

HOP इलेक्ट्रिक मोबिलिटी येत्या काळात दोन नवीन उत्पादने लाँच करणार आहे. यामध्ये हायस्पीड इलेक्ट्रिक दुचाकी HOP OXO आणि इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. या दोन्ही दुचाकींना एका पूर्ण चार्जवर 150 किमी आणि 120 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळेल असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही 80 पैशांचा झटका बसला आहे. बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जाहीर केले तेव्हा अनेक शहरांत पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले. मुंबईतही डिझेलने आता 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे. 80 पैशांच्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 101.01 रुपयांवर पोहोचले आहेत.

Advertisement

इलेक्ट्रिक स्कूटर-कार घेणाऱ्यांना बसणार झटका.. ‘त्यामुळे’ कंपन्या दरवाढ करण्याच्या विचारात..

Advertisement
Advertisement

Leave a Reply