Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. अमेरिका ‘त्यासाठी’ देणार पैसाच पैसा.. पहा, कोणाला रोखण्यासाठी अमेरिकेने केलाय प्लान..

दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंद-पॅसिफिक रणनितीसाठी सहकार्य म्हणून तब्बल 1.8 अब्ज (सुमारे 13,670 कोटी रुपये) ची रक्कम प्रस्तावित केली आहे. याशिवाय त्यांनी या क्षेत्रात चीनचा मुकाबला करण्यासाठी $400 दशलक्ष (सुमारे तीन हजार कोटी रुपये) अतिरिक्त मदतीचा प्रस्तावही ठेवला आहे. घोषणा 2023 च्या US$773 अब्ज वार्षिक बजेटचा भाग आहेत. जे अमेरिकेने त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पीय प्रस्तावांचा भाग म्हणून सादर केले आहे.

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, अमेरिका हिंद-प्रशांत क्षेत्रात आपली स्थिती आधिक भक्कम करत आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, बायडेन यांनी चीनबरोबरच्या धोरणात्मक स्पर्धेला प्राधान्य दिले आहे. बायडेन म्हणाले, की यासाठी आम्ही नवीन राजनैतिक, संरक्षण आणि सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, पुरवठा साखळी आणि हवामान उपक्रम इत्यादींचा समावेश केला आहे. बजेट हिंद-प्रशांतमध्ये स्थिरतेला प्रोत्साहन देते. चीन आणि रशियाच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदारांबरोबर कार्यवाही केली आहे. अर्थसंकल्पात युक्रेनसाठी 68.2 कोटी डॉलरची तरतूदही करण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान तैवान धोक्यात आला आहे. चीन रशिया प्रमाणेच कारवाई करुन तैवानवर कब्जा करेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसा अंदाजही व्यक्त होत असल्याने अमेरिकेने नवीन प्लान तयार करण्यास सुरुवात केली आहे. चीनने तैवानवर आक्रमण केले तर चीनवर आर्थिक निर्बंध टाकणारे विधेयक तीन अमेरिकन खासदारांनी काही दिवसांपूर्वी मांडले होते. सिनेट सदस्य रिक स्कॉट आणि अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील इतर दोन सदस्यांनी आर्थिक निर्बंध कायद्याद्वारे चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी एक विधेयक सादर केले होते. चीनचा तैवानबाबत आक्रमक दृष्टिकोन वाढला असतानाच हा प्रस्ताव आणण्यात आला होता.

Loading...
Advertisement

रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्याप्रमाणेच चीन तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातही आपले लष्करी सामर्थ्य दाखवू शकतो, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चीन या बेटाचा परिसर स्वतःचा मानतो आणि बळजबरीने तो ताब्यात घेण्याची धमकीही दिली आहे. याआधी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ म्हणाले होते की, अमेरिकेने तैवानला एक देश म्हणून औपचारिकपणे मान्यता दिली पाहिजे. अमेरिकेने 1979 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला मान्यता दिल्यावर तैवान बरोबरील राजनैतिक संबंध तोडले होते. तैवानचे अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना आहे.

Advertisement

अमेरिका चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत..! पहा, चीनच्या विरोधात कोणता नवा प्रस्ताव आलाय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply