Take a fresh look at your lifestyle.

Gold Price : आजही सोन्याच्या दरात मोठी घसरण.. जाणून घ्या, कशामुळे कमी होताहेत भाव..

दिल्ली : मंगळवारी सुद्धा सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 437 रुपयांनी कमी होऊन 51,151 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सत्रात सोन्याचा भाव 51,588 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भाव आज 722 रुपयांनी कमी होऊन 67,515 रुपये प्रति किलो झाला आहे. जागतिक बाजारात सोन्या-चांदीची किंमतीत कपात आणि रुपयात झालेली वाढ हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

आजचा दिवस जोडला तर सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. मंगळवारी रुपया 36 पैशांनी वधारला असून डॉलरच्या तुलनेत तो आता 75.80 वर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, आज स्पॉट सोन्याचा भाव $1,918 प्रति औंस, 0.25 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे, तर चांदी $24.80 प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

Advertisement

दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात $26.11 अब्ज होती. सध्याच्या काळात सोन्या चांदीते भाव सारखे बदलत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारही संभ्रमात पडले आहेत. रशिया युक्रेन युद्ध, महागाई आणि अन्य घटकांचा सोन्या चांदीच्या दरावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

सोने-चांदीला झटका..! पहिल्याच दिवशी भाव घटले.. जाणून घ्या, आज काय आहेत नवीन भाव..

Advertisement
Advertisement

Leave a Reply