Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून उसळणार भारतात महागाईचा आगडोंब..! पहा नेमके काय आहे यामागचे कारण

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत असलेल्या भारताने रशियाकडून सूर्यफूल तेल आयात करण्याचा मोठा करार केला आहे. 45,000 टन सूर्यफूल तेलाचा हा सौदा अत्यंत चढ्या भावात करण्यात आला आहे. ही आतापर्यंतची विक्रमी किंमत आहे. त्याची डिलिव्हरी पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये होईल. याचा सरळ अर्थ असा आहे की येत्या काही महिन्यांत देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढतील. म्हणजेच जोपर्यंत रुसो-युक्रेन युद्ध सुरू आहे, तोपर्यंत महागाईचे बॉम्ब ग्राहकांवर पडतच राहतील. (INDIA BUYS RUSSIAN SUNFLOWER OIL AT RECORD HIGH PRICE AS UKRAINE SUPPLIES HALT)

Loading...
Advertisement

युक्रेनने युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा बंद केला आहे. याशिवाय इंडोनेशियाने पाम तेलाचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. तर दक्षिण अमेरिकेत सोयाबीन पिकाचे उत्पादन घटले आहे. या सर्व कारणांमुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाची उपलब्धता कमी होऊन दर वाढले आहेत. त्यामुळेच हा सौदा चढ्या भावाने झाला आहे. भारत हा खाद्यतेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. आतापर्यंत युक्रेनमधूनच अधिक सूर्यफूल तेल आयात केले जात होते. जेमिनी एडिबल्स आणि फॅट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक प्रदीप चौधरी यांनी रॉयटर्सला सांगितले की, संघर्षामुळे युक्रेनमधून पुरवठा शक्य नसल्यामुळे भारतीय व्यापारी रशियाकडून पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेमिनी एडिबल्सने रशियाकडून 12,000 टन कच्चे सूर्यफूल तेल खरेदी करण्याचा करार केला आहे, ज्याचा एप्रिलमध्ये पुरवठा केला जाईल. प्रदीप चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, हा करार $ 2,150 प्रति टन झाला आहे. यामध्ये विमा आणि मालवाहतुकीचा खर्च देखील समाविष्ट आहे. युद्धापूर्वी कंपनीने सूर्यफूल तेल $ 1,630 प्रति टन आयात केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply