Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रशियाच्या युद्धखोरीने अमेरिकेची चांदी..! पहा नेमका कसा फायदा झालाय त्या देशाला

मुंबई : सध्या जगभरात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील युद्धामुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशावेळी आता जागतिक व्यापारात याचे वेगळे आणि दिसायला पाहिजे असेच परिणाम दिसत आहेत. अनेकवर्षे जगामध्ये मोठे आणि चर्चा होणारे युद्ध न झाल्याने संरक्षण साहित्याचा बाजार जरा शांत झाला होता. त्याला या युद्धामुळे गती आली आहे. इकडे युक्रेन देशात सामान्य जनतेची वाट लागलेली असताना अमेरिका देशाची मात्र चांदी झाली आहे. (Canada Edges Closer To F 35 Jets Deal With Lockheed Martin After Germany Amid Russia Ukraine Attack)

Advertisement

NATO सदस्य देश जर्मनीने अमेरिकेकडून पाचव्या पिढीचे F-35 लढाऊ विमान खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर कॅनडा देशानेदेखील $15 अब्ज किमतीचा करार करणार आहे. 88 नवीन लढाऊ विमाने पुरवण्यासाठी कॅनडाने अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीची निवड केली आहे. ही अमेरिकन कंपनी रडार डॉज F-35 लढाऊ विमानही बनवते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कॅनडा आणि जर्मनी या दोन्ही देशांनी या लढाऊ विमानाची निवड केली असून, हे विमान रशियाच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीला मात देण्यास सक्षम असल्याचे मानले जात आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, कॅनडाच्या मंत्री फिलोमिना टासी यांनी एफ-35 फायटर जेटच्या डीलची घोषणा केली. याआधी युक्रेनमधील युद्ध तीव्र झाल्याने संरक्षणावरील खर्च वाढवण्यासाठी अमेरिका कॅनडावर सातत्याने दबाव आणत होती. कॅनडाच्या या निर्णयानंतर अमेरिका आता लवकरच या कराराला मान्यता देईल, असे मानले जात आहे. ज्यावर ते गेल्या दशकापासून डोळे लावून बसले होते.

Loading...
Advertisement

“ही घोषणा रॉयल कॅनेडियन हवाई दलासाठी अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कॅनडाच्या स्पर्धात्मक प्रक्रियेतील आणखी एक मैलाचा दगड आहे,” असे टॅसी म्हणाले. कॅनडाला गेल्या दशकापासून त्यांचे जुने झालेले F-18 लढाऊ विमान बदलायचे आहेत. परंतु आतापर्यंत ते लढाऊ विमान निवडू शकले नाही. याआधी 2010 साली कॅनडाच्या तत्कालीन सरकारने 65 F-35 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती पण नंतर निर्णय रद्द केला. त्यानंतर हा निर्णय आजपर्यंत प्रलंबित होता. कॅनडाच्या भारतीय वंशाच्या संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी सांगितले की, F-35 विमाने जगभरातील नाटो सदस्य देश वापरत आहेत. हे एक परिपक्व आणि सक्षम विमान आहे आणि म्हणूनच आम्ही ते खरेदी करण्याच्या अंतिम प्रक्रियेत आहोत. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो लॉकहीड मार्टिन कंपनीशी सविस्तर संभाषण करणार आहेत. कॅनडाला आशा आहे की या वर्षाच्या अखेरीस हा करार होईल आणि देशाला 2025 मध्ये पहिले लढाऊ विमान मिळेल. यापूर्वी जर्मनीने 35 अमेरिकन F-35 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply