Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सॅमसंग-शाओमी नाही, तर ‘हा’ जुन्या कंपनीचा स्मार्टफोन देणार जिओ फोनला टक्कर; पहा, कोणत्या कंपनीने केलीय घोषणा..

मुंबई : कधीकाळी मोबाइलच्या दुनियेत फक्त नोकिया कंपनीचेच नाव होते. फोन म्हटला की नोकियाचाच असे समीकरण तयार झाले होते. मात्र, कंपनी काळानुसार बदलली नाही. तंत्रज्ञानातील बदल आत्मसात केले नाहीत. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे, की नोकिया नावही कुणाला आठवत नाही. सॅमसंग, अॅपल, शाओमी, ओप्पो, व्हीवो या कंपन्यांची जबरदस्त क्रेझ निर्माण झाली आहे. या कंपन्या आज आघाडीवर आहेत. असे असले तरी नोकिया कंपनी पुन्हा स्पर्धेत येण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने आजच्या जमान्यातील काही दमदार स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Advertisement

नोकियाने आपला किफायतशीर स्मार्टफोन Nokia C01 Plus लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज पर्यायामध्ये लाँच करण्यात आला आहे. हा 4G स्मार्टफोन जास्त बॅटरी लाइफसह सादर करण्यात आला आहे. फोन दोन वर्षांच्या सुरक्षा अपडेटसह येतो.

Advertisement

Nokia C01 Plus स्मार्टफोनची थेट स्पर्धा JioPhone Next बरोबर असेल. ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. Nokia C01 Plus स्मार्टफोनच्या 2 GB रॅम आणि 16 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,299 रुपये आहे. हाच 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंट 6,799 रुपयांना मिळेल. हा स्मार्टफोन दोन रंगाच्या पर्यायांमध्ये येईल.

Loading...
Advertisement

JioExclusive ऑफरमध्ये ग्राहक 5699 रुपये आणि 6199 मध्ये 600 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये Nokia C01 Plus स्मार्टफोन खरेदी करू शकतील. Jio सबस्क्रिप्शन ऑफरमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर 299 रुपयांच्या रिचार्जसह 4000 रुपयांचे फायदे दिले जात आहेत. Nokia C01 plus स्मार्टफोनच्या खरेदीवर एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी दिली जात आहे. हा फोन Jio एक्सक्लुजिव्ह ऑफरसह येईल.

Advertisement

Nokia C01 Plus स्मार्टफोनला 5.45 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचे स्क्रीन रिजोल्यूशन 720/1440 पिक्सेल असेल. स्मार्टफोन ऑक्टा-कोर 1.6GHz द्वारे समर्थित असेल. हा फोन Android 11 आवृत्तीवर काम करेल. Nokia C01 Plus स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या समोर 2MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याला 5VIA चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. हा स्मार्टफोन ड्युअल नॅनो सिम आणि मायक्रो एसडी कार्ड सपोर्टसह येईल. स्मार्टफोनमध्ये बायोमेट्रिक फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. फोनचे वजन 157 ग्रॅम आहे.

Advertisement

Nokia ने केलीय मोठी घोषणा..! ‘त्यासाठी’ कंपनीचा नवा प्लान तयार; बातमी आहे तुमच्या फायद्याची..

Advertisement
Advertisement

Leave a Reply