Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युद्धाच्या संकटात रशियाला मिळालीय खास ऑफर; अमेरिकेच्या मित्र देशाने केलाय ‘हा’ प्लान..

दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाचा आज 33 वा दिवस आहे. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाचे सैन्य पूर्ण ताकदीनिशी युक्रेनच्या राजधानीचे शहर कीवच्या दिशेने सरकत आहे. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे रशियाचेही मोठे नुकसान होत आहे. या निर्बंधात सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचा मित्र देश ब्रिटेनने मात्र रशियाला एक खास ऑफर दिली आहे. रशियाने जर सहमती दर्शवली तर त्यावरील निर्बंध मागे घेण्यात येतील, असे म्हटले आहे.

Advertisement

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लिज ट्रस यांनी सांगितले, की जर रशियाने युद्ध संपवले आणि युक्रेनमधून आपले सैन्य मागे घेतले तर त्यांचा देश रशिया आणि त्यांच्या कंपन्यांवरील निर्बंध मागे घेईल. रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी रशियाच्या भीतीमुळे तर नाटो युक्रेनला लढाऊ विमाने देत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला होता. विशेष म्हणजे, युक्रेनमध्ये रशियाचे भीषण हमले सुरूच आहेत.

Advertisement

एका महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या भीषण युद्धानंतरही रशियन सैन्याला युक्रेनचे राजधानीचे कीव ताब्यात घेता आलेले नाही. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे, की या युद्धात 16,000 रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे आणि 600 रशियन रणगाडे देखील नष्ट करण्यात आले आहेत. त्याचवेळी, रशियाच्या हमल्यात वाढ झाल्यानंतरही मानवतावादी मदत मिळत नसल्याचे युक्रेनच्या उप आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी जी-7 देशांनी रशियाच्या सेंट्रल बँकेला व्यवहारात सोन्याचा वापर करण्यास बंदी घातली होती. युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) मांडलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. युक्रेन संघर्षातून रशिया लष्करी आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत होईल, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यावेळी म्हटले होते. जपान अतिरिक्त 25 रशियन व्यक्तींची मालमत्ता गोठवेल आणि 81 रशियन संस्थांच्या निर्यातीवर बंदी टाकेल, असे जपानी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते.

Loading...
Advertisement

तेल-गॅस उत्पादक देशांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वितरणात वाढ करण्याचे आवाहन करा. तेल आणि वायू उत्पादनात ओपेकची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, G-7 नेत्यांनी तेल आणि वायू उत्पादक देशांना जबाबदारीने वागण्याचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वितरणात वाढ करण्याचे आवाहन केले, G-7 नेत्यांनी एका निवेदनात म्हटले होते.

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना रशियाला G20 गटातून वगळावे का, असे विचारले असता ते म्हणाले की माझे उत्तर होय आहे आणि ते G20 वर अवलंबून आहे. ते म्हणाले, की जर इंडोनेशिया आणि इतर देश रशियाला काढून टाकण्यात सहमत नसतील तर युक्रेनला बैठकांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली पाहिजे असे त्यांचे मत आहे.

Advertisement

‘G-7’ च्या एकाच निर्णयाने बसणार कोट्यावधींचा फटका; रशियाच्या अडचणी आणखी वाढणार; पहा, कसे ते..

Advertisement
Advertisement

Leave a Reply