‘G-7’ च्या एकाच निर्णयाने बसणार कोट्यावधींचा फटका; रशियाच्या अडचणी आणखी वाढणार; पहा, कसे ते..
दिल्ली : अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर युरोपिय देशांनी पुन्हा एकदा रशियाला जोरदार झटका दिला आहे. G7 संघटनेने ऊर्जा खरेदीसाठी रुबलमध्ये (रशियाचे चलन) पैसे देण्याची रशियाची मागणी नाकारली आहे. जर्मनीच्या ऊर्जामंत्र्यांनी सोमवारी ही माहिती दिली. जर्मनीचे ऊर्जा मंत्री रॉबर्ट हेबेक यांनी पत्रकारांना सांगितले, की “G-7 चे सर्व ऊर्जा मंत्री पूर्णपणे सहमत आहेत की रशियाकडून ऊर्जा संसाधनांच्या पुरवठ्यासाठी रूबलमध्ये पैसे देणे हे विद्यमान करारांचे एकतर्फी आणि स्पष्ट दुर्लक्ष असेल.
G-7 देशांच्या ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीनंतर हेबेक म्हणाले, की “रुबलमध्ये पेमेंट स्वीकारले जाणार नाही. आम्ही प्रभावित कंपन्यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर यांच्या मागण्यांचे पालन न करण्याचे आवाहन करू.” युरोपियन देशांनी रुबलमध्ये पैसे देण्यास नकार दिल्यास रशिया गॅसचा पुरवठा कमी करू शकतो का, असे विचारले असता, रशियन प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, की आम्ही कोणत्याही परिस्थितीत मोफत गॅस पुरवठा करणार नाही.”
दरम्यान, याआधी जी-7 देशांनी रशियाच्या सेंट्रल बँकेला व्यवहारात सोन्याचा वापर करण्यास बंदी घातली होती. युक्रेनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) मांडलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली होती. युक्रेन संघर्षातून रशिया लष्करी आणि राजकीयदृष्ट्या कमकुवत होईल, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यावेळी म्हटले होते. जपान अतिरिक्त 25 रशियन व्यक्तींची मालमत्ता गोठवेल आणि 81 रशियन संस्थांच्या निर्यातीवर बंदी टाकेल, असे जपानी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते. तेल-गॅस उत्पादक देशांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वितरणात वाढ करण्याचे आवाहन करा. तेल आणि वायू उत्पादनात ओपेकची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, G-7 नेत्यांनी तेल आणि वायू उत्पादक देशांना जबाबदारीने वागण्याचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वितरणात वाढ करण्याचे आवाहन केले, G-7 नेत्यांनी एका निवेदनात म्हटले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना रशियाला G20 गटातून वगळावे का, असे विचारले असता ते म्हणाले की माझे उत्तर होय आहे आणि ते G20 वर अवलंबून आहे. ते म्हणाले, की जर इंडोनेशिया आणि इतर देश रशियाला काढून टाकण्यात सहमत नसतील तर युक्रेनला बैठकांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली पाहिजे असे त्यांचे मत आहे.
बाब्बो.. आता रशियाचा सोन्याचा साठा धोक्यात..! ‘त्यासाठी’ अमेरिकेने केलाय ‘हा’ खास प्लान..