Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बँक ग्राहकांना बसलाय मोठा झटका; पहा नेमके काय कारण आहे यामागे

मुंबई : भारतभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय देशव्यापी संपाला आज २८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज असोसिएशन (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यासह अनेक बँक संघटनांनी आज आणि उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही दिवशी सभासद संपावर जाणार असल्याचे युनियनने म्हटले आहे. यामुळे बँक ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. अनेकांचे चेक आणि इतर व्यवहार ठप्प झालेले आहेत. परिणामी अनेकांना याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

Advertisement

“एआयबीईएने या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्रातील मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या संपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे युनियनने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने बँकांचे खाजगीकरण थांबवावे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बळकट करण्यासाठी पावले उचलावीत, अशी बँक संघटनांची मागणी असल्याचे युनियनने म्हटले आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका निवेदनात म्हटले आहे की, संपामुळे त्यांच्या बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एसबीआयने म्हटले आहे की, “आम्ही सल्ला देतो की बँकेने संपाच्या दिवसांमध्ये आपल्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सामान्यपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. असे असतानाही संपामुळे आमच्या बँकेतील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.” (BANK STRIKE TODAY SBI PNB RBL AND OTHER BANK SERVICES AND ATMS AFFECTED KNOW DETAILS PMGKP)

Advertisement

Advertisement

Leave a Reply