Jio चा आणखी एक धमाका..! आता आणलाय थेट महिनाभराचा प्लान; पहा, तुम्हाला कोणते फायदे मिळणार..?
मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio ने आणखी एक शानदार प्लान लाँच केला आहे. कंपनीचा हा प्लान 259 रुपयांचा आहे. विशेष म्हणजे, कंपनीचा हा प्लान पूर्ण 30 दिवसांचा आहे. प्लानमध्ये युजर्सना इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉल सारख्या फीचर्सचा लाभ मिळतो. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये 30 दिवसांची वैधता दिली जाते. अशा प्रकारे एकूण हाय स्पीड डेटा 45 GB होतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत. याशिवाय जिओ अॅप फ्री सब्सक्रिप्शनही दिले जाते.
जर युजरने 5 मार्च रोजी नवीन 259 च्या मासिक प्लॅनसह रिचार्ज केले, तर पुढील रिचार्जची तारीख 5 एप्रिल, नंतर 5 मे आणि त्यानंतर 5 जून असेल. तुम्हाला हवे असल्यास, इतर Jio प्रीपेड प्लॅन्सप्रमाणे, तुम्ही 259 चा प्लान एकाच वेळी अनेक वेळा रिचार्ज करू शकता. यासह, सध्याच्या अॅक्टिव्ह योजनेनंतर नवीन महिन्यात ते आपोआप अॅक्टिव्ह होईल. त्यामुळे तुम्हाला पुन्हा रिचार्ज करण्याचा त्रास कमी होईल.
५५५ रुपयांचा प्लॅनही लॉन्च केला आहे
259 रुपयांच्या प्रीपेड प्लानशिवाय, कंपनीने 555 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील सादर केला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना 55 दिवसांसाठी 55GB डेटा दिला जातो. पण हा एक फक्त डेटा प्लान आहे म्हणजे यूजर्सना या प्लानसोबत व्हॉईस कॉल आणि एसएमएसचा लाभ मिळणार नाही. डिस्ने+ हॉटस्टार ओव्हर-द-टॉप (OTT) सबस्क्रिप्शन देखील प्लानमध्ये समाविष्ट केले आहे.
सर्व टेलिकॉम कंपन्या आता 1 महिन्याच्या नावाने 28 दिवसांचा प्रीपेड प्लान ऑफर करतात. यावर काळजी व्यक्त करत ट्रायने कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. दूरसंचार नियामक TRAI (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) ने जानेवारीमध्ये सांगितले की दूरसंचार कंपन्यांना किमान एक प्लान व्हाउचर, एक विशेष टॅरिफ व्हाउचर आणि 30 दिवसांच्या वैधतेसह एक कॉम्बो व्हाउचर ऑफर करावे लागेल. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांनी पूर्ण 30 दिवसांचे काही प्लान आणले आहेत.