पुणे : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोमवारीही देशातील मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदी या दोन्हींचे दर कमी होताना दिसले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सकाळी 9 वाजता सोन्याचा फ्युचर्स भाव 155 रुपयांनी घसरून 51,721 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही किंमत 24 कॅरेट सोन्याची आहे. याआधी सोन्याचा दरही 51,721 या दराने सुरू झाला आहे. सकाळच्या टप्प्यातील हे दर आहेत. दिवसभरात यामध्ये आणखीही बदल होऊ शकतो.
चांदीच्या फ्युचर्स किमतीतही व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच घसरण दिसून आली. चांदीचा भाव 316 रुपयांच्या घसरणीसह 68,520 रुपये प्रति किलो होता. सकाळी चांदीचा भाव 68,511 वर उघडला, जो काही काळानंतर थोड्या वाढीसह व्यवहार करत होता. मात्र, मागील व्यवहार दिवसाच्या तुलनेत त्यात घट दिसून येत होती. जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.28 टक्क्यांनी वाढून $1,948.80 प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीचा स्पॉट दर 0.70 टक्क्यांनी वाढून $25.44 प्रति औंस झाला. जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर लवकरच दिसून येईल, असे अपेक्षित आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण होईल, असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. रशियाकडेही सोन्याचा मोठा साठा असून तो जागतिक बाजारपेठेत विक्री करायचा आहे. हे सोने बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि भावात मोठी घसरण होऊ शकते.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात $26.11 अब्ज होती. सध्याच्या काळात सोन्या चांदीते भाव सारखे बदलत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारही संभ्रमात पडले आहेत. रशिया युक्रेन युद्ध, महागाई आणि अन्य घटकांचा सोन्या चांदीच्या दरावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सोने-चांदी चमकले..! पहा, मागील 5 दिवसांत किती रुपयांनी वाढलेत भाव.. चेक करा, डिटेल..