रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला होणार फायदा..! गहू निर्यातीसाठी मोदी सरकारने केलाय ‘हा’ खास प्लान..
दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या गव्हाची मागणी वाढली आहे. आतापर्यंत, या दोन देशांतून गहू आयात करणारे सुमारे 30 देश लवकरच भारताकडून गहू घेऊ शकतात. त्यासाठी केंद्र सरकारने आपल्या पातळीवर नियोजन सुरू केले आहे. वास्तविक, भारताला गहू निर्यातीच्या बाबतीत रशिया आणि युक्रेनची जागा घ्यायची आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा देशांबरोबर करार करून किंवा खाजगी व्यापार माध्यमांद्वारे गव्हाची निर्यात वाढ करण्यावर भर देत आहे.
कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) मधील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की हे देश आधीच रशिया आणि युक्रेनसह भारतातकडून गहू आयात करत आहेत. मात्र रशिया आणि युक्रेनच्या तुलनेत भारताचा वाटा खूप कमी होता. मात्र युद्धानंतर भारत आता या दोन देशांच्या तुलनेत आपला हिस्सा वाढ करण्याचे काम करत आहे. या देशांमध्ये इजिप्त, सीरिया, मोरोक्को, तुर्की, अझरबैजान, सुदान, इटली, येमेन, ग्रीस आणि पूर्व आफ्रिकेतील सर्व देशांचा समावेश आहे. जे एखाद्या वेळीच भारताकडून गहू खरेदी करतात.
सध्या गव्हाच्या निर्यातीत रशिया आणि युक्रेनचे वर्चस्व आहे. अनेक मोठे देश या दोन देशांतून गहू आयात करतात. मात्र युद्धानंतर परिस्थिती बदलली आहे. भारताची गव्हाची मागणी इतर देशांमध्ये वाढताना दिसत आहे. अशा देशांमध्ये गहू निर्यात करून सध्याच्या संकटात पर्यायी व्यवस्था करू नये, असा उद्देश आहे. उलट आम्हाला या देशांच्या बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या गव्हाचा विश्वासार्ह पुरवठादार व्हायचे आहे. आम्ही अल्पकालीन नफ्याकडे पाहत नाही परंतु जगातील आघाडीच्या गहू आयात करणार्या देशांबरोबर मजबूत आणि दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.
आज जगातील प्रमुख गहू आयात करणाऱ्या देशांमध्ये इजिप्त, इंडोनेशिया, तुर्की, चीन, नायजेरिया, इटली, अल्जेरिया, फिलीपिन्स, जपान, मोरोक्को यापैकी भारताचा गहू बांगलादेश, इंडोनेशिया, फिलीपिन्स, नायजेरिया आणि जपानमध्येच जातो. अशा परिस्थितीत भारताकडे निर्यात वाढ करण्याची मोठी क्षमता आहे, कारण प्रमुख निर्यातदार देश रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इतर देश सध्या अंतर या देशांपासून अंतर ठेऊन आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी वाणिज्य मंत्रालयाने बोलावलेल्या बैठकीत या 30 देशांना गहू निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रमुख गहू निर्यातदार तसेच इतर संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने 2023 या आर्थिक वर्षात सुमारे 11 ते 12 दशलक्ष टन गहू निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे आर्थिक वर्ष 2022 पेक्षा 70 ते 72 लाख टन अधिक आहे. मात्र, काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, 1 ते 11 दशलक्ष टन निर्यातीचे उद्दिष्ट ठीक असू शकते कारण पावसाळ्यात निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत एका हिंदी वेबसाइटने वृत्त दिले आहे.
आणि म्हणून गहूप्रकरणी पाकचे झाले जगभरात हसू..! पहा नेमके काय म्हटलेय व्हिडिओमध्ये
ठरलं तर..! ‘या’ दिवशी ‘त्या’ लोकांसाठी भारत पाठवणार गहू; पाकिस्ताननेही घेतलीय माघार..