Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी चमकले..! पहा, मागील 5 दिवसांत किती रुपयांनी वाढलेत भाव.. चेक करा, डिटेल..

मुंबई : देशातील सोने मार्केटमध्ये सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर सुद्धा वाढले आहेत. या व्यापार सप्ताहात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 428 रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 1004 रुपयांची वाढ झाली आहे. IBJA वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (21 ते 25 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,464 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी चांदीची किंमत 67,687 रुपयांवरून 68,691 रुपये प्रति किलो झाली आहे.

Advertisement

IBJA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्काआधीच्या आहेत. IBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समावेश केलेला नाही.

Advertisement

21 मार्च रोजी सोने 51,464 प्रति 10 ग्रॅम होते. त्यानंतर 22 मार्च रोजी 51 हजार 504 रुपये, 23 मार्च रोजी 51 हजार 637 रुपये, 24 मार्च रोजी 51 हजार 818 रुपये आणि 25 मार्च रोजी 51 हजार 892 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर होते. तसेच या काळात 21 मार्च रोजी चांदी 67 हजार 687 रुपये प्रति किलो, 22 मार्च रोजी 67 हजार 775 रुपये, 23 मार्च रोजी 67 हजार 734 रुपये, 24 मार्च रोजी 67 हजार 864 रुपये, 25 मार्च रोजी 68 हजार 691 प्रति किलो असे चांदीचे दर होते.

Loading...
Advertisement

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात $26.11 अब्ज होती. सध्याच्या काळात सोन्या चांदीते भाव सारखे बदलत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारही संभ्रमात पडले आहेत. रशिया युक्रेन युद्ध, महागाई आणि अन्य घटकांचा सोन्या चांदीच्या दरावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

अर्र.. युद्धाच्या संकटात देशाचा सोने साठा घटला.. पहा, कशामुळे घडलाय ‘हा’ परिणाम..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply