Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Russia Ukraine War : अमेरिका-युरोपनंतर आता जपान; जपानी बँकांनी रशियाला दिलाय जोरदार झटका..

दिल्ली : युक्रेन विरोधात युद्ध सुरू केल्यापासून रशिया (Russia) जगात एकटा पडत चालला आहे. रशियावर कठोर निर्बंध टाकून त्याला एकटे पाडण्यात अमेरिका (America) आणि युरोपातील देश आघाडीवर आहेत. जपानही या देशांना मदत करत आहे. मुळात जपान अतिशय लहान देश आहे. मात्र, जगात भक्कम अर्थव्यवस्था आणि अमेरिकेचे पाठबळ या जमेच्या बाजू असल्याने थेट रशियावर निर्बंध टाकत आहे. आताही जपानने (Japan) असाच एक निर्णय घेतला आहे. अनेक प्रमुख जपानी बँकांनी (Japanese Bank) रशियाच्या सबेर बँकेबरोबर डॉलरचे व्यवहार समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. क्योडो वृत्तसंस्थेने शनिवारी ही माहिती दिली.

Advertisement

वृत्तसंस्थेनुसार, जपानमधील तीन वित्तीय संस्था अमेरिकन करस्पॉन्डंट बँकांमार्फत सबेर बँकेबरोबर डॉलरचे व्यवहार करतात. मीडियाने वृत्त दिले आहे, की 26 मार्चपासून सबेर बँकेसंबंधित व्यवहारांवर बंदी घालण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे जपान आणि रशियन बँकांमधील व्यवहार देखील अशक्य झाले आहेत. जपानी वित्तीय संस्था सबेर बँकेबरोबर इतर चलनांमध्ये देखील व्यवहार बंद करतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

दरम्यान, रशियावर कठोर निर्बंध टाकून त्याला एकटे पाडण्यात अमेरिका आणि युरोपातील देश आघाडीवर आहेत. आताही अमेरिका आणि युरोपिय देशांनी असा एक निर्णय घेतला आहे ज्याचा फटका रशियाला बसणार आहे. रशिया युरोपला नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल पुरवठा करणारा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. त्यामुळे रशियन ऊर्जेवरील युरोपिय देशांचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) ने लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) संदर्भात मोठ्या कराराची घोषणा केली आहे. बीबीसीने नुकत्याच दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

Loading...
Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान शुक्रवारी या कराराची घोषणा करण्यात आली. करारानुसार, अमेरिका वर्षाच्या अखेरीस युरोपिय संघाला किमान 15 अब्ज अतिरिक्त घनमीटर एलएनजी प्रदान करेल. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून रशियन वायूचा वापर कमी करणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. याचा अर्थ असा होईल, की आयात वाढ करणे आणि अधिक अक्षय ऊर्जा निर्माण करणे याला सर्वोधिक प्राधान्य दिले जाणार आहे.

Advertisement

.. म्हणून भारत आणि चीन आलेत एकाच गटात..! जपानने मात्र रशियाला दिलीय धमकी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply