मुंबई : सध्याच्या वाढत्या महागाईच्या दिवसात नागरिकांना दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव वेगाने वाढत आहेत. किरकोळ आणि घाऊक महागाई (Inflation) दरात मोठी वाढ झाली आहे. वाढलेल्या किंमतीतने नागरिक हैराण झालेले असतानात आता आणखी एका कंपनीने या महागाईत भर टाकण्याचे काम केले आहे. देशातील लोकप्रिय कार निर्माता कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (Toyota Kirloskar) कंपनीने दरवाढ करण्याचे म्हटले आहे. वाढत्या किमतीचा परिणाम कमी करण्यासाठी वाहनांच्या किमतीत वाढ करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी संपूर्ण मॉडेल श्रेणीच्या किमती 4 टक्क्यांनी वाढ करणार आहे. नवीन किमती 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत. कंपनी भारतात एकूण 7 प्रकारच्या कार विक्री करते.
कंपनीने सांगितले की, कच्च्या मालासह वाढत्या खर्चामुळे ही किंमत वाढली आहे. 25 मार्च रोजी बीएमडब्ल्यू इंडियाने आपल्या वाहनांच्या किमतीत 3.5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. याशिवाय ऑडी आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या लक्झरी कार निर्मात्या कंपन्या 1 एप्रिलपासून किमतीत वाढ करण्याचा विचार करत आहेत.
कंपनीने बँकॉक इंटरनॅशनल मोटर शोमध्ये टोयोटा फॉर्च्युनरची नवीन कार सादर केली आहे. यामध्ये, कंपनीने नवीन डिझाइन केलेले लॅम्प हाऊसिंगसह, 20 इंच व्हील, डायनॅमिक रेडार क्रूझ कंट्रोल, स्पॉट मॉनिटर आणि रेड क्रॉस ट्रॅफिक अलर्ट सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. देशातील कारमध्ये मात्र ही वैशिष्ट्ये उपलब्ध नाहीत.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) आणि बॅटरी उत्पादकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि जीवनावश्यक घटकांच्या किमती वेगाने वाढत आहेत. जेव्हा देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी जास्त असेल तेव्हा ही अडचण आणखी वाढू शकते, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत वाढू शकते, असे सांगण्यात आहे. तसे पाहिले तर सध्याच्या परिस्थितीत या वाहनांच्या किंमती खूप जास्त आहेत. त्यामुळे जास्त मागणी मिळत नाही. त्यात सरकारकडून अनुदान दिले जात आहे. त्यामुळे किंमती काही प्रमाणात कमी होतात. अशी परिस्थिती असताना किंमती वाढल्या तर वाहनांच्या मागणीत घट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
इलेक्ट्रिक स्कूटर-कार घेणाऱ्यांना बसणार झटका.. ‘त्यामुळे’ कंपन्या दरवाढ करण्याच्या विचारात..