Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तर यंदाही कांदा बियाणे तुटवडा..! पहा नेमके काय कारण ठरलेय शेतकऱ्यांच्या डोकेदुखीचे

पुणे : मागील काही वर्षांपासून कांदा बियाण्याची मागणी आणि पुरवठा हे सर्कल ब्रेक झालेले आहे. परिणामी नामांकित आणि विश्वासार्ह असल्याची आवई उठवणाऱ्या बियाणे कंपन्यांनी आणि नव्याने बाजारात आलेल्या फसवणूक बहाद्दर कंपन्यांनी कांदा उत्पादकांची घोर फसवणूक चालवली आहे. यंदाही अशा बाजारू मंडळींना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण कांदा बियाणे उत्पादन यंदाही कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी बोगस बियाणे आणि परराज्य किंवा अगदी चोरून बाहेर देशातून मागवलेले कांदा बियाणे यंदा पुहा एकदा शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (onion farming and seed issue in Maharashtra. Honey bee and environment problem in seed farming)

Advertisement

गतवर्षी कांदा बियाण्याला मिळालेला भाव पाहता यंदा कांदा बियाण्यातून आर्थिक उन्नतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी कांदा बिजोत्पादन प्लॉट डेव्हलप केले. मात्र, वातावरणातील बदलामुळे कांदा बियाणे पिकावर चिकटा रोग आणि मधमाशांची परागीकरण करण्याची क्रिया तितकी वेगवान होत नसल्याने कांदा बियाणे उत्पादन घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यंदाही ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्याने परागीकरणासाठी आवश्यक असलेली पावडर धुऊन गेल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मोबाईल टॉवर्समुळे बीज संक्रमणासाठी आवश्यक असलेल्या मधमाशा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचाही मोठा फटका वर्षानुवर्षे बसत आहे.

Loading...
Advertisement

कांदा बीज पूर्णपणे फुलोऱ्यात भरण्यासाठी दोन प्रकारे बीज संक्रमण होत असते. यामध्ये मधमाशीद्वारे व हवेद्वारे परागीकरण होऊन बीज वाढत असते. परंतु हवेतून होणारे संक्रमण अत्यल्प असल्याने कांदा बियाणे उत्‍पादनासाठी मधमाशांची आवश्यकता असते. परंतु कांदा बियाणे आवर्तीवर रोग पडल्याने व त्यात पाय गुंतत असल्याने मधमाशा या फुलांवर बसत नाहीत. परिणामी परागीकरण न झाल्याने कांदा बियाण्यामध्ये अशा अडचणी येत आहेत. खासगीरीत्या परागीकरण करण्यासाठी सुती कापडाचा, धोतराचा वापर करून दररोज सकाळी फुलावरून अलगद हा कपडा फिरवल्याने बीज संक्रमण हा उपाय अत्यंत त्रासदायक, जास्त मनुष्यबळ लागणारा व काळजीने करण्याचा असल्याने शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply