Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आजही बसलाय पेट्रोल-डिझेल महागाईचा झटका; पहा, किती रुपयांनी वाढलेत इंधनाचे भाव..

मुंबई : देशातील 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर पेट्रोल डिझेलचे भाव जोरात वाढत आहे. भाववाढ काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज शनिवारी सुद्धा या महागाईने सर्वसामान्यांना जोरदार झटका दिला आहे. आज देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

Advertisement

शनिवारी तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 98.61 रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर 89.87 रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 113.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.55 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ झाली आहे, तर मुंबईत पेट्रोल 84 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 85 पैशांनी वाढ झाली आहे.

Advertisement

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सलग 4 दिवस 80-80 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत गेल्या 4 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3.20 रुपयांनी वाढ झाली आहे. तेलाच्या किमती वाढण्याआधी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर होती, जी आज 98.61 रुपये प्रति लीटर झाली आहे.

Advertisement

हैदराबाद शहरात पेट्रोल 111.78 रुपये आणि डिझेल 98.08 रुपये दराने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 107.99 रुपये तर डिझेल 93 रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल 104.41 रुपये तर डिझेल 94.46 रुपये, बंगळुरूमध्ये पेट्रोल 103.91 रुपये तर डिझेल 88.12 रुपये, भोपाळमध्ये पेट्रोल 110.7 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर या नव्या दराने मिळत आहे.

Loading...
Advertisement

तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरातही आज वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $120.7 च्या पातळीवर पोहोचल्या आहेत. शनिवारी WTI क्रूडच्या किमती वाढल्यानंतर प्रति बॅरल $113.9 आणि ब्रेंट क्रूडच्या किमती वाढल्यानंतर प्रति बॅरल $120.7 वर गेल्या आहेत.

Advertisement

पेट्रोल कंपन्यांना ‘इलेक्शन झटका’; तब्बल 19,000 कोटींचा बसलाय फटका..!

Advertisement

म्हणून वाढत आहेत पेट्रोलच्या किमती; पहा नेमके काय कारण सांगितले गडकरींनी

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply