Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. पांढऱ्या दुधाचा काळा धंदा उघड..! पहा कशाद्वारे बनवत होते केमिकलचे दुध

औरंगाबाद : रसायनयुक्त दूध प्यायल्याने पोटदुखी, उलट्या होऊ शकतात. आतड्यांना संसर्ग होऊन आतड्यांवर सूज येऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी होते. जास्त प्रमाणात असे रसायनयुक्त दूध प्यायल्यास जिवावरही बेतू शकते. हे आपणा सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्याकडे थेट शेतकऱ्यांकडून येणारे किंवा पिशवीमधील दुध असेच रसायनयुक्त नसेल याचीही खात्री आता उरली नाही. असाच प्रकार बीड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. (chemical milk health issue)

Advertisement

पाटोदा तालुक्यातील नागेशवाडीत पांढऱ्या दुधाच्या नावाखाली सुरू असलेल्या या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे. मात्र, हे खूप छोटे प्रकरण आहे. बीड जिल्ह्यासह राज्यभरात असे रॅकेट सक्रीय आहे. सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील पाेलिसांनी छाप्यात केमिकलपासून तयार केलेले १६० लिटर दूध, पावडर असे ४९ हजारांचे साहित्य जप्त केले असून अप्पासाहेब हरिभाऊ थोरवे याला ताब्यात घेतले अाहे. बीडचे अन्न सुरक्षा अधिकारी महादेव गायकवाड यांनी शुक्रवारी पाटोदा पोलिस ठाण्यात भेट देत पोलिसांनी जप्त केलेले ते बनावट दूध व मुद्देमाल हस्तगत केला. जप्त केलेल्या दुधाचे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील.

Loading...
Advertisement

नागेशवाडीत अप्पासाहेब थोरवे हा बनावट दुधाची पावडर व केमिकलच्या साहाय्याने दूध तयार करत होता. तयार केलेले दूध गायी व म्हशीच्या दुधात मिसळून डेअरीवर विक्री करत होता. पाण्यात अगोदर मिल्क पावडर मिसळली जायची. त्यानंतर त्या मिश्रणात ग्लुकोज टाकत होता. त्यापासून तयार झालेले बनावट दूध चोरीने विक्री केले जात होते. हे दूध आरोग्यास हानिकारक असल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, पोलिस नाईक आशा चौरे यांनी ही कारवाई केली.

Advertisement

Advertisement

Leave a Reply