Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून स्पर्धा आयोगाची Google वर वक्रदृष्टी; पहा नेमके काय पुढे आलेय प्रकरण

मुंबई : कोणत्याही व्यवसायात एकाधिकारशाही होऊ नये आणि व्यावसायिक स्पर्धेचा ग्राहकांना लाभ मिळत राहावा यासाठी स्पर्धा आयोग लक्ष ठेवत असते. मोबाईल सेक्टरमध्ये (Mobile Sector) जशी रिलायन्स जिओ (Reliance Jio) यांची एकाधिकारशाही प्रस्थापित होण्याची भीती आहे तशीच ऑनलाईनमध्ये फेसबुक (Facebook) आणि गुगल (Google) यांची झालेली आहे. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही. अशावेळी आता या आयोगाच्या रडारवर गुगल ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी आली आहे. मात्र, त्याला एक तक्रार हे निमित्त ठरले आहे. आयोगाने आपणहून याची दखल काही घेतली नव्हती.

Advertisement

गुगलविरोधात वृत्तपत्र प्रकाशकांच्या तक्रारींवर भारतीय स्पर्धा आयोगाने (cci / spardha ayog / competition commission of India) चौकशीचे आदेश दिले असून याबाबत आरोप आहे की, गुगल एकाधिकाराचा वापर करत प्रकाशकांना त्यांच्या सामग्रीच्या वापराबाबत योग्य ती रक्कम देत नाही. इंडियन न्यूजपेपर साेसायटी (आयएनएस) यांच्या तक्रारीवरून गुगलची ही चौकशी सीसीआय महासंचालकांच्या देखरेखीत होणार आहे. आयएनएसने तक्रारीत म्हटले होते की, गुगलची पितृक कंपनी अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी, गुगल इंडियासह इतर संबंधित युनिट भारतातील ऑनलाइन न्यूज मीडिया बाजारात न्यूज रेफरल सर्व्हिस आणि गुगल अॅड टेक सर्व्हिसेसमध्ये आपल्या दबदब्याचा लाभ होत नाही. डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध केल्या जात असलेल्या वृत्तांसाठी प्राेड्यूसर किंवा प्रकाशन संस्थांना त्यांच्या कंटेंटच्या वापराच्या बदल्यात योग्य मोबदला दिला जात नाही.

Loading...
Advertisement

ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि फ्रान्ससह अनेक देशांनी असे कायदे केलेत की त्याअंतर्गत गुगलसह सर्व टेक्नॉलॉजी कंपन्यांना सर्चद्वारे मिळणारे कंटेंटसाठी प्रकाशकांना योग्य रक्कम द्यावीच लागेल. युराेपियन पब्लिशर्स काउंसिलनेही गुगलविरोधात तक्रार केली आहे. आयएनएसच्या मते गुगल जाहिरात महसूल आणि हिस्सा शेअर करण्यासंदर्भात मीडिया संस्थांना अंधारात ठेवते आहे. त्यामुळे आता आयोग याप्रकरणी काय भूमिका घेते आणि केंद्र सरकार कशा पद्धतीने याकडे लक्ष देते यावर याची पुढील दिशा ठरणार आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply