Jio चा IPL धमाका प्लान..! खास आयपीएलसाठी आणलाय ‘हा’ रिचार्ज प्लान; पहा, किती पैसे होतील खर्च
पुणे : आजपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहेत. देशभरात आयपीएलसाठी जबरदस्त क्रेझ असते. त्यात यावेळी कोरोनाचे टेन्शन कमी आहे. त्यामुळे आयपीएलसाठी वेगळाच उत्साह जाणवत आहे. टेलिकॉम कंपन्याही यामध्ये मागे नाहीत. कंपन्यांनी आयपीएल निमित्त काही खास डेटा प्लान आणले आहेत. यामध्ये रिलायन्स जिओने आघाडी घेतली आहे. कंपनीने असा एक जबरदस्त प्लान लाँच केला आहे, ज्यामुळे आयपीएल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली आहे.
वास्तविक जिओने IPL सुरू होण्याआधी एक खास क्रिकेट अॅड-ऑन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. ज्यामुळे तुम्ही आरामात आणि अतिशय कमी पैशात आयपीएल क्रिकेट सामने पाहू शकता. या प्लानचे काय फायदे आहेत आणि कोण त्याचा फायदा घेऊ शकतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Jio ने Rs 279 किमतीचा एक नवीन क्रिकेट अॅड-ऑन पॅक लाँच केला आहे, जो Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतो. हे IPL 2022 साठी अगदी वेळेवर आले आहे, जे 26 मार्चपासून सुरू होणार आहे. या योजनेसह, डिस्ने + हॉटस्टार एक वर्षाचे सबस्क्रिप्शन आणि एकूण 15GB हाय-स्पीड इंटरनेट दिले जाईल.
याच्या मदतीने जिओच्या युजर्सना वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज भासणार नाही. तथापि, नवीन रु. 279 प्लान केवळ निवडक युजर्ससाठी उपलब्ध आहे, सर्वांसाठी नाही. हा प्लान तुमच्यासाठी उपलब्ध आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही MyJio च्या मोबाइल अॅपवर जाऊन याबाबत आधिक माहिती घेऊ शकता. या प्लानमध्ये कॉल आणि एसएमएसची सुविधा मात्र मिळणार नाही.
Jio च्या या 499 रुपयांच्या क्रिकेट प्लानची वैधता 28 दिवसांची असेल. याशिवाय या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध असतील.
जिओचा 601 रुपयांचा प्लान हा दररोज 3 जीबी डेटा देणारा प्लान आहे. या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता असेल. या प्लानमध्ये Disney + Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असेल, ज्यावर तुम्ही IPL क्रिकेट सामने पाहू शकाल. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध असतील.
Jio चा 336 दिवसांचा जबरदस्त प्लान.. एकाच वेळी मिळतात ‘इतके’ फायदे; चेक करा डिटेल..