Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाया.. फिकर नॉट.. पंक्चर टायर होणार ऑटोमेटिकली दुरुस्त..! पहा JK टायरच्या तंत्रज्ञानाची कमाल

नागपूर : प्रवासादरम्यान गाडीचा टायर अचानक पंक्चर झाला तर मोठी समस्या निर्माण होते. अशावेळी प्रवासाला का आलो असेच वाटायला लागते. म्हणूनच आता ट्युबलेस टायरची मागणी वाढली आहे. मात्र, त्याच्याही अडचणी आहेतच की. पण म्हणूनच आता ही समस्या लवकरच भूतकाळात जमा होईल. टायर कंपनी जेके टायर (जेके टायर अँड इंडस्ट्रीज / JK Tyre & Industries) यांनी अशा तंत्रज्ञानासह एक टायर सादर केला आहे, जो पंक्चर झाल्यास स्वतःच दुरुस्त करेल. होय, मंडळी ही काही अफवा नाही.

Advertisement

देशात प्रथमच कंपनीने कारच्या टायरमध्ये पंक्चर गार्ड तंत्रज्ञान (Puncture Guard Technology) वापरण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानाने बनवलेल्या टायर्समध्ये खास इंजिनिअर केलेल्या सेल्फ-हीलिंग इलास्टोमर इनर कोटने सुसज्ज असेल. ज्यामुळे पंक्चर आपोआप दुरुस्त होईल. चारचाकी टायरमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्याची कंपनीची योजना आहे. या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले टायर्, जर खिळ्याने किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने पंक्चर झा, तर ते ट्रेड एरियामध्ये (Tread Area) 6 मिमी खोलपर्यंतचे पंक्चर आपोआप दुरुस्त करणार आहेत. म्हणजेच जर तुमच्या कारमध्ये पंक्चर गार्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज असे टायर असतील, तर तुम्ही पंक्चरची चिंता न करता प्रवास करू शकाल.

Loading...
Advertisement

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) रघुपती सिंघानिया म्हणतात की, या तंत्रज्ञानाद्वारे वाहन मालकांना उच्च पातळीची सुरक्षा आणि सुविधा मिळेल. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार देशातील सर्व प्रकारच्या ऑन-रोड आणि ऑफ-रोड परिस्थितीत याची चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, जेके टायरने सुमारे दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये स्मार्ट टायर तंत्रज्ञान सादर केले. या टायर्समध्ये स्मार्ट सेन्सर बसवलेले आहेत, जे टायरची स्थिती, हवेचा दाब आणि तापमान यांची रिअल टाइम माहिती देतात. हा डेटा संकलित केला जातो आणि वाहन मालकाच्या मोबाईल फोनवर ब्लूटूथद्वारे प्राप्त केला जातो, जो अॅपद्वारे पाहता येतो.

Advertisement

Advertisement

Leave a Reply