Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल कंपन्यांना ‘इलेक्शन झटका’; तब्बल 19,000 कोटींचा बसलाय फटका..!

मुंबई : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine war) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगात कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या (petrol price hike) आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) पेट्रोल पंप बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी 2008 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर कंपनीने आपले सर्व पेट्रोल पंप बंद केले होते. असा प्रकार पुन्हा घडण्याची भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे. तर, निवडणूक कालावधीत पेट्रोल भाववाढ न केल्याने देशातील सरकारी पेट्रोल पंप कंपन्यांना तब्बल 19,000 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. केंद्र सरकारने कर कमी करून भाव कमी करणे अपेक्षित होते. मात्र, त्याचा भार थेट कंपन्यांवर टाकल्याने सरकारच्या सुस्थितीत असलेल्या कंपन्यांना याचा मोठा झटका बसला आहे.

Advertisement

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2014 पासून जागतिक क्रूडच्या किमतींशी जोडल्या गेल्या आहेत. परंतु देशातील प्रमुख तीन कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (Bharat Petroleum Corporation) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (Hindustan Petroleum Corporation) गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर ते 21 मार्च या कालावधीत दरात वाढ केलेली नाही. मूडीजच्या अहवालानुसार या कंपन्यांना 19,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मूडीजच्या अहवालानुसार, नोव्हेंबर ते मार्च दरम्यान, IOC ला $1 ते 1.1 अब्ज, BPCL आणि HPCL चे प्रत्येकी $55 ते 650 दशलक्ष नुकसान झाले. जेव्हा पेट्रोल आणि डिझेलची किंमत शेवटची बदलली गेली तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 82 च्या आसपास होती, जी सध्या $ 120 च्या आसपास आहे. तज्ज्ञांच्या मते डिझेलच्या दरात प्रतिलिटर 13.1 ते 24.9 रुपयांची वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे पेट्रोलचा दर 10.60 रुपयांवरून 22.30 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

Loading...
Advertisement

Advertisement

Leave a Reply