Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वाव.. ‘Honda’ ने ‘त्यामध्ये’ मारलीय बाजी..! पहा, तब्बल 21 वर्षात कोणते मोठे रेकॉर्ड केलेय..

मुंबई : देशात आघाडीवर असणाऱ्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर कंपनीने नवीन रेकॉर्ड केले आहे. कंपनीने 21 वर्षात 30 लाख वाहन निर्यातीचा टप्पा पार केला आहे. Honda 2Wheelers India ने 2001 मध्ये त्याच्या पहिल्या मॉडेल Activa दुचाकी स्कूटर निर्यात सुरू केली होती. 2016 मध्ये, Honda ने एकूण 15 लाखांचा टप्पा पार केला होता. त्याचवेळी, गेल्या 5 वर्षांत कंपनीने 15 लाखांहून अधिक दुचाकींची निर्यात केली आहे.

Advertisement

2020 मध्ये, कंपनीने जागतिक निर्यातीवर लक्ष केंद्रीत केले. जपान, अमेरिका आणि युरोप यांसारख्या विकसित बाजारपेठांमध्ये दुचाकी निर्यातीत वाढ केली. याशिवाय HMSI ने गुजरात येथील आपल्या चौथ्या कारखान्यातून जागतिक इंजिनांचे उत्पादन सुरू केले आहे.

Advertisement

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, की कंपनीसाठी हे यश कंपनीच्या प्रयत्नांचा एक मोठा भाग आहे. गेल्या वर्षी, आम्ही गुजरातमधील प्रकल्पामध्ये जागतिक इंजिन उत्पादन सुरू केले, ज्यामुळे आमची निर्यात क्षमता आणखी भक्कम झाली. जसजसे आम्ही विकसित बाजारपेठेत प्रवेश करतो, तसतसे निर्यात विस्तारावर आमचे लक्ष पुन्हा केंद्रीत होत आहे. गेल्या दोन दशकात, कंपनीने निर्यातीद्वारे 30 लाख लोकांचे स्वप्न सत्यात आणले आहे. आता कंपनी डिओ स्कूटर्ससह मोटारसायकलच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या संकटातून वाहन उद्योग पूर्वपदावर येत असतानाच सेमी कंडक्टरच्या टंचाईने नवे संकट उभे केले आहे. त्यानंतर आता पुन्हा टेन्शन देणारा अहवाल मिळाला आहे. क्रिसिल (Crisil) या नामांकित संस्थेने सांगितले की, दुचाकींच्या विक्रीत सलग तिसऱ्या आर्थिक वर्षातही घट होऊ शकते. ग्रामीण भागातील दुचाकींच्या मागणीत घट, सणासुदीच्या काळात विक्रीत घट, वाढत्या किमती आणि लोकांनी टाळलेली खरेदी यांसारख्या कारणांमुळे चालू आर्थिक वर्षात दुचाकींच्या विक्रीत 8-10 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

Loading...
Advertisement

एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात विक्रीतील घट सलग दोन वर्षांच्या घसरणीनंतर आधीच कमी आधारावर अपेक्षित आहे. जी सन 2021 मध्ये 13 टक्के आणि 2020 मध्ये 18 टक्के होती. एका दशकाहून अधिक काळातील ही पहिलीच वेळ आहे की सलग तीन आर्थिक वर्षांपासून दुचाकी विक्रीत घट होत आहे.

Advertisement

दुचाकीसाठी विमा घेताय..? ; मग, ‘अशा’ पद्धतीने कमी करता येईल विमा हप्ता; वाचतील पैसे..

Advertisement

तीन कंपन्यांच्या दमदार दुचाकी..! खरेदी करण्याआधी जाणून घ्या काय आहेत खास फिचर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply